Hot Posts

6/recent/ticker-posts

बबनरावजी शिंदे शुगरची ३२५०० क्विंटल साखर जोराच्या वादळी पावसाने भिजली

अंदाजे १० कोटी रूपयांचे मोठे नुकसान
माढा (प्रतिनिधी)ः बबनरावजी शिंदे शुगर ऍड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड तुर्क पिंपरी /(केवड ता.माढा) ता. बार्शी या साखर कारखान्याच्या गोडावून मधील ३२५०० क्विंटल साखर मंगळवारी सायंकाळी ५ वाजता झालेल्या जोराच्या वादळी पावसामुळे भिजून अंदाजे १० कोटी रूपयांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह (भैय्या) शिंदे यांनी दिली आहे.  मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारे व पावसाने माढा तालुका व बार्शी तालुक्यातील ब-याच ठिकाणी वादळी वारे व गारपीट आणि पाऊस पडला आहे परंतु या वादळी पावसाने अनेक ठिकाणी घरे व झाडे पडली आहेत. तसेच अनेक प्राणी वीज पडल्याने व वृक्ष अंगावर पडून मृत्यूमुखी पडले आहेत. याचबरोबर तुर्क पिंपरी/ केवड येथील बबनरावजी शिंदे शुगर ऍड अलाईड इंडस्ट्रीजच्या   गोडावून वरील काळा ताडपञी कागद वादळी वा-याने फाटला आणि पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गोडावून मधील साखरेच्या पोत्यात शिरले त्यामुळे ३२५०० क्विंटल साखर भिजून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रसंगी उपळाई खुर्दचे युवानेते संदीप पाटील, उप जनरल मॅनेजर शहाजी गिराम, शेतकी अधिकारी शहाजी हांडे, प्रशासनचे अमरसिंह पाटील, फक्रुद्दीन सवाळे, गणेश चव्हाण यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. 
Reactions

Post a Comment

0 Comments