Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूरला जूनपासूनच कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात

मुंबई ः यावर्षी दमदार पावसाचा अंदाज असला तरी राज्य सरकारने कृत्रिम पावसाच्या दृष्टीकोनातून तयारी केली आहे. सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे कृत्रिम पावसाचे केंद्र सोलापूर येथे सुरु करण्यास केंद्र सरकारने ’ग्रीन सिग्नल’ दिला आहे. येत्या जून महिन्यापासूनच दुष्काळग्रस्त भागात कृत्रिम पाऊस पाडण्याची यंत्रणा सज्ज असणार आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी राज्य सरकार व केंद्र सरकारकडे सोलापूर येथे कृत्रिम पावसाचे केंद्र सुरु करण्यासाठी पत्रव्यवहार करुन नियमित पाठपुरावा केला होता. त्यास अखेर यश आले. केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी सुभाष देशमुख यांच्या मागणीला मान्यता देत येत्या जून महिन्यापासूनच प्रायोगिक पातळीवर कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय जाहिर केला. गेल्या वर्षी सोलापूर येथील सिंहगड कॉलेज येथे कृत्रिम पावसासाठी आवश्यक रडार बसविण्यात आले होते. त्याद्वारे माहितीचे संकलन व इतर कार्य सुरु होते. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आता कृत्रिम पावसाचा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प जूनपासून कार्यान्वित होतोय. सर्वांगीण विचार करता सोलापूर शहराचे भौगोलिक स्थान हे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात असल्याने याचा फायदा होईल. तसेच, अवर्षण प्रवण भागात पाऊस नेहमीच कमी पडतो. त्यामुळे या भागात कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लावता येऊ शकतो.
Reactions

Post a Comment

0 Comments