Hot Posts

6/recent/ticker-posts

दक्षिण सोलापूर मतदारसंघ व जिल्ह्यातील पाणी प्रश्नांचा निपटारा होणार

सोलापूर (प्रतिनिधी)ः दक्षिण सोलापूर मतदार संघातील पाणी प्रश्नांवर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंत्रालय, मुंबई येथे आढावा बैठक घेतली. मंद्रूप गाव व परिसरातील नागरिकांना वरदायी असलेला सीतामाई तलाव भरण्यासाठी कुरूल शाखेतून फिडर कालवा काढण्याकरिता वखार महामंडळातून दीड कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असून ६३ लाख वितरित करण्यात आले आहे, मे अखेर काम चालू करण्याचे निर्देश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले. तसेच ऊझऊउ मधून १ कोटीच्या निधी मंजुरीसाठी पत्र देण्याचे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना दिले.
दक्षिण सोलापूर व जिल्ह्यातील जलसंपदा विभागाची बैठक मुंबई येथे  सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी खाजगी सचिव विद्याधर महाले, जलसंपदा विभागाचे सचिव पानसे, कार्यकारी संचालक कृष्णा खोरे महामंडळ घोटे, जलसपंदा पुणे विभाग मुख्य अभियंता राजपूत, जलसंपदा अधीक्षक अभियंता शिवाजी चौगुले, अधिकारी उपस्थितीत होते.
यावेळी कारंबा कालवा शाखा सुरु करून, दि.३० एप्रिल पर्यंत निविदा काढण्यासोबत सदर बाबींचा आढावा घेतला. यामध्ये वडापुर  भीमा नदी  बॅरेज बांधण्यासंदर्भातील तांत्रिक बाबी पूर्ण करून, केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणे, देगाव कॅनॉल शाखेचे उर्वरित काम पूर्ण करून सप्टेंबरमध्ये नागरिकांना पाणी मिळेल असे नियोजन करून कामाला गती देण्याचे निर्देश सुभाष देशमुख यांनी बैठकीत दिले. बंदलगी बंधारा दुरुस्ती / नवीन बांधण्यासाठी निविदा काढल्या असून दि.२४ एप्रिल पर्यंत मुदत असल्याची माहिती अधिकार्‍यांनी यावेळी दिली असता, १ कोटी ५६ लाख निधी मंजूर झाले आहे. मुदतीनंतर लगेच पुढील कार्यवाही करून १ मे ला कामाचे आदेश काढण्याच्या सूचना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्या. आष्टी उपसा सिंचन योजना, एकरुख उपसा सिंचन योजना, शिरापूर उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी देणे, होटगी, निंबर्गी व माळकवठे येथील तलाव भरणे, सीना  भीमा जोड कालवा बांधणे व सर्वेक्षणाचे कामाला गती देणे, तेरामैल येथील जमीन वापरात आणणे, भंडारकवठे व कुरघोट येथे चिबड जमीन सुधारणेसाठीचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. पाठपुरावा घेऊन मंजुरी घेणे. व मे महिन्यात काम सुरु करा असे आदेश यावेळी बैठकीत सुभाष देशमुख यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. हिप्परगा तलाव गाळ काढणे, राष्ट्रीय महामार्गावर ब्रिज कम बंधारा बांधण्याकरिता छकAख च्या अधिकारी व जलसंपदा विभागाचे अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन कामास गती देण्याचे तसेच सीना नदीत सोडण्यात आलेले पाणी बंदलगी बंधार्‍यापर्यंत पोहचवण्याचे निर्द्रेश पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांना निर्द्रेश सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.  
Reactions

Post a Comment

0 Comments