सोलापूर (प्रतिनिधी)ः उजनीची दुहेरी पाईपलाईन मंजूर झाल्याबद्दल सर्व सोलापूरकराचे वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक आभार व अभिनंदन. अनेक वर्षापासून सोलापूरामध्ये दुस-या जलवाहिनीची गरज होती. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने ७०० कोटीची योजना मंजूर करुन मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मी महापौर झाल्यानंतर सर्वप्रथम तत्कालीन केंद्रीय नगरविकास मंत्री व विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव साहेब यांच्याकडे भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे मनपाने १२४० कोटी रकमेच्या दुहेरी लाईन यामध्ये अनेक प्रकाराची बचत सुचविली आणि ती योजना ७०० कोटी पर्यंत करुन ५०० कोटी रु वाचविलेआणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली सोलापूरचा भीषण पाणी प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या महापौरपदाचे आज सार्थक झाल्याचे समाधान मला वाटत आहे. याकामी ही बचत आयुक्तांना सुचवत असताना आयुक्त डॉ.अविनाश ढाकणे यांनी अत्यंत कल्पकतेने ही बचत जमेस धरुन अत्यंत सुंदर असा प्रकल्प आराखडा तयार केला. त्यापौकी ४३९ कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मंजूर करुन सोलापूरकरांना दिलेल्या वचनाची पुर्ती केली आहे. याकामी सोलापूर महापालिकेला उजनी धरणातून पाणी उचलण्यासाठी जे आरक्षण असावे लागते त्यासाठी महाराष्ट्राचे अवर सचिव श्री बिराजदारसाहेब यांनी अत्यंत कमी वेळात हे पाण्याचे आरक्षण मला मंजूर करुन दिले आणि या योजनेची मुहुर्तमेढ रोवली. पाणी आरक्षणाशिवाय हा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नसता. यानिमित्ताने मी त्यांचेही आभार मानते तसेच वेळोवेळी महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन , नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील सहकार व पणन मंत्री सुभाषबापू देशमुख , कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आ. सुजितसिंह ठाकुर यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले आहे, या सर्वांचे सदर योजनेच्या वेळेस यथोचित सत्कार आम्ही करणार आहोत.
0 Comments