विठ्ठलवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबध्द- चेअरमन रणजितसिंह शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 17, 2026

विठ्ठलवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबध्द- चेअरमन रणजितसिंह शिंदे

 विठ्ठलवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबध्द- चेअरमन रणजितसिंह शिंदे 

माढा (कटूसत्य वृत्त):- मागील अनेक वर्षांपासून माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नातून विठ्ठलवाडी गावातील अनेक महत्त्वाचे प्रश्न व समस्या मार्गी लावल्या आहेत.गावातील उर्वरित पाणंद रस्ते,वीज समस्या,सीना-माढा उपसासिंचन योजनेचे पाणी माळावरील मोठ्या पाझर तलावात सोडणे,शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप करणे आदी प्रश्न प्राधान्याने सोडविणार असून टप्प्याटप्प्याने गावच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे.

ते विठ्ठलवाडी ता.माढा येथे सदिच्छा भेटीच्या वेळी ग्रामस्थ,शेतकरी व युवकांसोबत संवाद साधताना बोलत होते.

प्रास्ताविक आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.

यावेळी चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी उपसासिंचनचे पाणी माळावरील मोठ्या पाझर तलावात  सोडण्यासाठी व ऊस गाळपासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून तात्काळ कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले.यावेळी ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी गावातील विविध प्रश्न व समस्या मांडल्या त्या सोडविण्याची ग्वाही देत मनमोकळेपणाने रणजितसिंह शिंदे यांनी संवाद साधला.बरेच प्रश्न व समस्या जागेवरुन सोडविल्या त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.यावेळी चेअरमन रणजितसिंह शिंदे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सोसायटीचे संचालक अशोक गव्हाणे व माजी सरपंच बालाजी गव्हाणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी डीसीसी बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी अनिलकुमार अनभुले व प्रगतशील द्राक्ष उत्पादक शेतकरी अशोक गव्हाणे यांचा चेअरमन रणजितसिंह शिंदे व सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिलकुमार बरकडे यांचा उपळाई खुर्दचे सरपंच संदीप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी सरपंच अनिलकुमार बरकडे यांनी विठ्ठलवाडी येथील वैयक्तिक,सामाजिक व विकासात्मक कामे मार्गी लावताना सर्वसामान्य जनता व सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित बोलावून विश्वासात घेऊन निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी उपळाई खुर्दचे सरपंच संदीप पाटील, चेअरमन अनिलकुमार अनभुले,अशोक गव्हाणे, सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड,माजी सरपंच बालाजी गव्हाणे, अनिलकुमार बरकडे,सहाय्यक अधिक्षक विजय गव्हाणे,लेखापरीक्षक सुहास शिंगाडे, सेवानिवृत्त बँक इन्स्पेक्टर नारायण खांडेकर, मुख्याध्यापक सौदागर गव्हाणे,उपाध्यक्ष भिमराव शिंगाडे,रामदास कोकाटे,धनाजी सस्ते, सत्यवान शेंडगे,पांडुरंग शिंगाडे,कांतीलाल मुळे,नेताजी कदम,धर्मा उमाटे,दत्तात्रय खैरे, मोहन भांगे,शिवाजी वाघमोडे,सतीश गुंड, अंकुश शिंगाडे, ग्रामसेवक सुधाकर गव्हाणे,श्रीमंत शिंगाडे, शिवाजी काशीद, शिवाजी कोकाटे,लहू शिंगाडे,कैलास सस्ते, तानाजी मोटे,अशोक कदम,संकेत गव्हाणे, प्रशांत कदम यांच्यासह ग्रामस्थ,शेतकरी व युवक उपस्थित होते.

सूत्रसंचालन करून आभार वाचनालयाचे माजी अध्यक्ष राजेंद्र गुंड यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages