सिंचन योजनांच्या कामांना गती द्या; मंजुरीचे प्रस्ताव तातडीने पाठवा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 27, 2026

सिंचन योजनांच्या कामांना गती द्या; मंजुरीचे प्रस्ताव तातडीने पाठवा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

 

सिंचन योजनांच्या कामांना गती द्या; मंजुरीचे प्रस्ताव तातडीने पाठवा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील




मुंबई (कटूसत्य वृत्त):-जलसंपदा प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करून सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी ज्या योजनांच्या कामांना शासन स्तरावरून मंजुरीची आवश्यकता आहे अशा योजनांच्या कामाचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत, अशा सूचना जलसंपदा ( कृष्णा व गोदावरी खोरे विकास महामंडळ) मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी दिल्या.

जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांनी आज मंत्रालयात मांजरा धरणाचे पाण्याचे कमांड क्षेत्र वाढवणे, शेवगाव-पाथर्डी, संगमनेर संघातील सिंचन योजना, जायकवाडी उपसा जलसिंचन, वांबोरी चारी टप्पा क्र.२ मधून शेगवे तुकाई (ता. नेवासा) गावास पाणी उपलब्ध देणे, तालुका क्रीडा संकुल पाथरी करता जायकवाडी पाटबंधारे विभाग दोन यांची पाथरी शहरालगतची जमिनीचा आगाऊ ताबा देऊन हस्तांतरित करणे तसेच मानवत व परभणी तालुक्यातील ५४ गावच्या सिंचनाच्या प्रस्तावाच्या सर्व्हेक्षणास गती देणे, किकवी धरण प्रकल्पाबाबत आढावा, हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषांतर्गत कळमनुरी मतदार संघात सिंचन योजनांना मान्यता देणे आणि सिद्धेश्वर उपसा जलसिंचन व केळी पाझर तलावात पाणी उपलब्ध करून देणे याविषयी आढावा घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

जलसंपदा मंत्री विखे-पाटील म्हणाले, सिंचन प्रकल्पांतील प्रलंबित कामे, भूसंपादन, प्रशासकीय मान्यता आणि पाणी उपलब्धतेसंदर्भातील प्रश्न तातडीने मार्गी लावाव्यात. सिंचन सुविधांचा विस्तार, प्रलंबित प्रकल्प आणि पाणी उपलब्धतेशी संबंधित प्रश्नांवर लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रकल्पांच्या कामातील अडचणी दूर करून त्यांना गती देण्यावर भर द्यावा. स्थानिक पातळीवरील सिंचनविषयक प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत अशा सूचना जलसंपदा विखे पाटील यांनी दिल्या.

संबंधित विषयांच्या बैठकीस सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (दूरदृश्य प्रणालीद्वारे), आमदार अमोल खताळ, मोनिका राजळे, राहुल ढिकले, राजू नवघरे, विठ्ठलराव लंघे, संतोष बांगर (दूरदृश्य प्रणालीद्वारे) जलसंपदा विभागाचे सचिव जयंत बोरकर, सह सचिव प्रसाद नार्वेकर, कार्यकारी संचालक श्री. गवळी, मुख्य अभियंता श्री. नाईक व श्रीमती जगताप यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages