महाराष्ट्राला केंद्राच्या अतिरिक्त कर हस्तांतरणातून ७ हजार २२ कोटींचा निधी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, November 2, 2026

महाराष्ट्राला केंद्राच्या अतिरिक्त कर हस्तांतरणातून ७ हजार २२ कोटींचा निधी

महाराष्ट्राला केंद्राच्या अतिरिक्त कर हस्तांतरणातून ७ हजार २२ कोटींचा निधी



नवी दिल्ली(कटूसत्य वृत्त):-  केंद्र सरकारने राज्यांना कर हस्तांतरणाचा अतिरिक्त हप्ता जारी केला असून, त्याअंतर्गत महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी देशातील सर्व राज्यांना एकूण १ लाख ९ हजार १९ कोटी रुपयांचे कर हस्तांतरण करण्यात आले आहे.

नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त चालू आर्थिक वर्षात देण्यात आलेला हा दुसरा अतिरिक्त हप्ता आहे. या निधीमुळे महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्प, विकासकामे आणि विविध लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीला आर्थिक बळ मिळणार आहे. तसेच भांडवली खर्चाला चालना देऊन राज्याच्या विकासात्मक प्राधान्यक्रमांनुसार निधीचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.

केंद्राकडून प्राप्त झालेल्या या अतिरिक्त निधीमुळे राज्यातील सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देणे, विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच विविध कल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्यास महाराष्ट्राला मदत होणार आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages