वृक्ष संवर्धन समिती बार्शीने तयार केले पक्षांसाठी पाणवटे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 18, 2026

वृक्ष संवर्धन समिती बार्शीने तयार केले पक्षांसाठी पाणवटे

  वृक्ष संवर्धन समिती बार्शीने तयार केले पक्षांसाठी पाणवटे




बार्शी (कटूसत्य वृत्त):- सध्या दुष्काळ ग्रस्त परिस्थिती असल्यामुळे सगळीकडे चिंतेचे वातावरण आहे. येणाऱ्या दिवसात पाण्याचे नियोजन कसे करायचे. शेतीचे सोडा पण पिण्याला देखील पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. अशा परिस्थितीत वृक्ष संवर्धन समिती बार्शीने पक्षांची काळजी घेत कृत्रिम पानवटे तयार करण्यास सुरुवात केली आहे. माणूस आपल्या अन्नपाण्याची व्यवस्था कशी ही करेल पण या पर्यावरणाचे मुख्य घटक असलेले पक्षी कीटक आणि मधमाशा यांच्या देखील जीवन मरणाचा प्रश्न सध्या आहे. याचेच भान ठेवून वृक्ष संवर्धन समितीमार्फत शासकीय आयटीआय परिसरात दोन सिमेंटचे बशी सारखे  सुंदर पाणवटे तयार करण्यात आले आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी या परिसरात वृक्ष संवर्धन समिती मार्फत दुर्मिळ वृक्ष उद्यान तयार करून तेथे अनेक देशी आणि दुर्मिळ पर्यावरणाला उपयोगी पक्षांच्या आवडीची झाडे त्या ठिकाणी लावलेली आहेत. त्यामुळे त्या परिसरात पक्षांचा वावर वाढला आहे. सकाळच्या रामप्रहरी पक्षांची किलबिलाट त्या ठिकाणी असते. यामध्ये सुगरण, चिमणी, काळी चिमणी, कोतवाल, सूर्यपक्षी, भारद्वाज, कावळे, चित्तर, वेडा राघू, पांगळी/पाकोळी, मुनिया, टिवटीवी, साळुंकी, शिंपी, पारवा, व्हला येडा राघू, पोपट,कावळे अशा प्रकारच्या स्थानिक पक्षांचा समावेश आहे. भविष्यात हा परिसर पक्ष्यांनी गजबजलेला असेल आणि अशाच प्रकारचे पाणवटे शहरातील विविध भागात करण्याचा माणस आहे असे वृक्ष संवर्धन समितीत बार्शीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी सांगितले.
 गेल्या आठ वर्षापासून बार्शी शहर आणि परिसरात वृक्ष संवर्धन समिती मार्फत अनेक झाडे लावून ती संवर्धित केली आहेत. झाडांबरोबरच पर्यावरणातील उपयुक्त अशी जैवविविधता टिकवण्यासाठी वृक्ष संवर्धन समिती बार्शी ने उचललेले हे मोठे पाऊल आहे. या उपक्रमासाठी शासकीय आयटीआय चे प्रिन्सिपल प्रदीप हरिदास यांचे देखील सहकार्य लाभले आहे हे पाणवटे तयार करण्यासाठी वृक्ष संवर्धन समितीचे सदस्य संतोष कुमार गायकवाड, प्रा आनंद धुमाळ, राहुल तावरे, मोहम्मद शेख, अक्षय घोडके,उमेश नलवडे, राणा देशमुख, सायरा मुल्ला,
सुधीर वाघमारे, डॉ. प्रवीण मिरगणे, डॉ. श्रीराम देशमुख, सचिन थोरबोले, डॉ वासुदेव सावंत, दयानंद रेवडकर यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages