बाबुराव पाटील महाविद्यालयात संविधान दिन साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, November 27, 2026

बाबुराव पाटील महाविद्यालयात संविधान दिन साजरा

 बाबुराव पाटील महाविद्यालयात संविधान दिन साजरा




अनगर (कटूसत्य वृत्त):- बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय,अनगर येथे राष्र्टीय सेवा योजना,समान संधी केंद्र व राज्यशास्र विभाग आयोजित २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.चंद्रकांत सुर्यवंशी हे होते याप्रसंगी त्यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात राज्यघटनेचे महत्व, सध्याचे वास्तव व लोकशाही याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन प्रा. डॉ.महादेव चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.महादेव चव्हाण यांनी केले तर आभार प्रा.डाॅ.महादेव गायकवाड यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages