जळीत खून खटल्यातील आरोपीस में. जिल्हा व सत्र न्यायालय पंढरपूर कडून जामीन मंजूर
यातील आरोपी मंगल तिचे शंकरगाव तालुका पंढरपूर येथील मयत अंबादास संताराम खांडेकर यांचे सोबत अनैतिक संबंधातून जाळून मारलेचा पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 611/2026 ने भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) (जुने IPC 302), 238 प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता सदर खुनाचा आरोप आरोपीवर करण्यात आलेला होता. सदर खुनाच्या घटनेनंतर आरोपीस 16 सप्टेंबर 2026 रोजी अटक केलेली होती तदनंतर आरोपीने अँड अभयसिंह माधवराव देशमुख यांचेमार्फत पंढरपूर येथील मे जिल्हा व सत्र न्यायालयाकडे नियमित जामीन मिळणे कामी अर्ज दाखल केलेला होता. सदर आरोपीच्या जामीन अर्जावर आरोपीच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत पंढरपूर येथील मे जिल्हा व सत्र न्यायाधीश यांचे कोर्टाने आरोपीस नियमित जामीन मंजूर केला.
सदर प्रकरणात सरकार पक्षाचे वतीने सरकारी वकील शेख यांनी काम पाहिले तर आरोपीचे वतीने अँड अभयसिंह माधवराव देशमुख, अँड. ओंकार लिगाडे, अँड. गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.

No comments:
Post a Comment