जिल्हा बँकेची सत्ता भाजपच्या हाती; १० जागा बिनविरोध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 18, 2026

जिल्हा बँकेची सत्ता भाजपच्या हाती; १० जागा बिनविरोध

 जिल्हा बँकेची सत्ता भाजपच्या हाती; १० जागा बिनविरोध

उर्वरित नऊ जागांसाठी २६ नोव्हेंबरला मतदान

मोहिते-पाटलांची माघार; अध्यक्षपदाच्या समीकरणांकडे लक्ष!



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बातमी समोर आली आहे. सोलापूर जिल्हा बँकेवर भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनलची सत्ता निश्चित झाली आहे.

संचालक मंडळाच्या 19 जगापैकी भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनलचे 10 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 9 जागावर भाजपच्या वतीने उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, विधान परिषद आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार राजन पाटील यांचे दोन्ही पुत्र विक्रांत आणि अजिंक्यराणा पाटील हे बिनविरोध निवडून आले आहेत.

19 पैकी 9 जागासाठी 26 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 27 नोव्हेबरला मतमोजणी होणार

दरम्यान, माजी आमदार प्रशांत परिचारक, शंभूराजे जगताप, यशवंत शिंदे, सिद्धेश्वर अवताडे, पृथ्वीराज माने, श्रीदीप हसापुरे यांची देखील बिनविरोध म्हणून निवड झाली आहे. दरम्यान सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख हे सुद्धा भाजप पुरस्कृत पॅनलमध्ये सहभागी झाले आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उर्वरित 19 पैकी 9 जागासाठी 26 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 27 नोव्हेबरला मतमोजणी होणार आहे.

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला

दरम्यान, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची आजची शेवटची तारीख होती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी पणन आणि दुग्ध संस्था या दोन्ही मतदारसंघांतून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मोहिते-पाटील यांच्यासह 6 माजी संचालकांच्या अपात्रतेविरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने 16 नोव्हेंबर 2026 रोजी फेटाळून लावली आहे.

भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता येणार हे जवळपास निश्चित

दरम्यान, सोलापूर जिल्हा बँकेवर भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता येणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आत्तापर्यंत सोलापूर जिल्हा बँकेच्या 19 पैकी 10 जागेवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. यामध्ये भाजप प्रणित आघाडीचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, यशवंत शिंदे, विक्रांत पाटील, माजी आमदार प्रशांत परिचारक, श्रीदीप हसापुरे, पृथ्वीराज माने, अजिंक्यराणा पाटील, सिद्धेश्वर आवताडे, शंभूराजे जगताप यांचा समावेश आहे.या विजयी घौडदौडीबाबत भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हा बँक निवडणुकीत सक्षम उमेदवार देणे हा क्रायटेरिया लावला होता. ही निवडणूक लागायला नको होती मात्र ती लागली. मी आणि राजन पाटील यांनी बिनविरोध करण्यासाठी मोहिते पाटलांशी चर्चा केली होती मात्र दुर्दैवाने ते झालं नाही, मोहिते पाटलांनी अवास्तव जागा मागितल्या ज्यामुळे निवडणूक लागली, असं ते प्रशांत परिचारक म्हणाले. तसेच अध्यक्ष पदासाठी कोणतीही चर्चा नाही आमचा पक्ष ठरवेल तो अध्यक्ष असेल, असंही त्यांनी स्पष्ट केले.
आता अध्यक्षपदाच्या समीकरणांकडे लक्ष!
दहा जागांवरील बिनविरोध निवड, उर्वरित नऊ जागांसाठी होणारी निवडणूक, सहा माजी संचालकांची अपात्रता आणि मोहिते-पाटील गटाची माघार या सर्व घडामोडींमुळे जिल्हा बँकेच्या सत्तासमीकरणाला नवे वळण मिळाले आहे. भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनेलचे दहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने संचालक मंडळातील त्यांचे संख्याबळ स्पष्ट झाले आहे. मात्र, उर्वरित नऊ जागांवरील निकालानंतरच संपूर्ण संचालक मंडळाचे चित्र स्पष्ट होईल.
त्याचबरोबर बँकेचे आगामी अध्यक्षपद कोणाकडे जाणार, कोणत्या नेत्याला संधी मिळणार आणि जिल्ह्यातील सहकार क्षेत्रावर कोणाचे नेतृत्व राहणार, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages