सोलापूर महापालिकेचा थकबाकीदारांना दणका! १२ मिळकतींना ठोकले सील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 28, 2026

सोलापूर महापालिकेचा थकबाकीदारांना दणका! १२ मिळकतींना ठोकले सील

 सोलापूर महापालिकेचा थकबाकीदारांना दणका! १२ मिळकतींना ठोकले सील





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने आता कठोर पावले उचलली आहेत. वारंवार नोटिसा देऊनही थकबाकी न भरणाऱ्या मिळकतधारकांच्या १२ मिळकतींना महापालिकेच्या कर विभागाने सील ठोकले आहे. २०, २६ आणि २७ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. या मिळकतींकडे एकूण ३१ लाख ३६ हजार ३६५ रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे.

#महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी मिळकतकर वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. थकबाकीदारांना यापूर्वी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारवाईचा इशारा देण्यात आला होता. तसेच संबंधित मिळकतधारकांना नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अधिनियमातील तरतुदीनुसार सील करण्याची कारवाई करण्यात आली.

थकबाकी भरल्यानंतरच सील उघडणार!

थकीत मिळकतकराची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच सील उघडण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व मिळकतधारकांनी आपली थकीत रक्कम तातडीने भरून महापालिकेला सहकार्य करावे आणि पुढील कठोर कारवाई टाळावी, असे आवाहन कर विभागाकडून करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages