1 ते 10 नोव्हेंबर दरम्यानचे रू.3150/-प्रमाणे बील शेतक-यांच्या खात्यात जमा- बबनराव शिंदे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, November 17, 2026

1 ते 10 नोव्हेंबर दरम्यानचे रू.3150/-प्रमाणे बील शेतक-यांच्या खात्यात जमा- बबनराव शिंदे

 1 ते 10 नोव्हेंबर दरम्यानचे रू.3150/-प्रमाणे बील शेतक-यांच्या खात्यात जमा- बबनराव शिंदे


टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब कारखान्याचा सन 2026-2027 चा गाळप हंगाम सुरू झालेला असून या हंगामात दि.01 ते 10 नोव्हेंबर दरम्यान गाळपास आलेल्या ऊसासाठी ॲडव्हान्स हप्ता  प्रती टन 3150 रूपये प्रमाणे ऊस बिल शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करणेत आला आहे अशी माहीती कारखान्याचे संस्थापक चेअरमन मा.आ.बबनराव शिंदे  यांनी दिली.
अधिक माहीती देताना संस्थापक चेअरमन बबनराव शिंदे म्हणाले, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब या कारखान्याचा सन 2026-27 चा गाळप हंगाम दि.15 ऑक्टोबर पासून सुरू झालेला आहे. आजअखेर युनिट नं.1 कडे 3 लाख 96 हजार 183 मे.टन व युनिट नं.2 कडे 1 लाख 38 हजार 482 मे.टन असे एकूण 5 लाख 34 हजार 665 मे.टन गाळप झालेले आहे. 

या हंगामात दोन्ही युनिटकडे दि.01 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत गाळपास आलेल्या ऊसाचे जाहीर केलेनुसार प्रती टन रू.3150/- प्रमाणे ॲडव्हान्स ऊस बिल सभासद,बिगरसभासद व ऊस पुरवठादार शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करणेत आले आहे. त्यासाठी कारखान्याने 52 कोटी 49 अदा केले असून आजअखेर ऊस बिलासाठी एकूण 137 कोटी 59 लाख अदा केले आहेत. कारखान्याने 10 दिवसाला ऊस बिल अदा करणेची परंपरा या हंगामात देखील कायम राखलेली आहे अशी माहीती संस्थापक चेअरमन मा.आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

कारखान्याची ऊस व तोडणी वाहतूक बिले वेळेत मिळत असल्याने अनेक शेतकरी व वाहनमालक त्यांचा ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्यास देण्यास प्राधान्य देत आहेत. सन 2026-27 गळीत हंगामामध्येही ऊस पुरवठादारांनी त्यांचा ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्यास पुरवठा करून हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मा.आ.शिंदे यांनी केले. 

सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन पोपटभाऊ गायकवाड. कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे, युनिट नं.2 चे जनरल मॅनेजर पी.एस.येलपले व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages