एमआयटीत "रामभाऊ जोशी - जीवन प्रवास" चरित्रग्रंथाचे प्रकाशन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 7, 2026

एमआयटीत "रामभाऊ जोशी - जीवन प्रवास" चरित्रग्रंथाचे प्रकाशन

 एमआयटीत  "रामभाऊ जोशी - जीवन प्रवास" चरित्रग्रंथाचे प्रकाशन



पुणे, (कटूसत्य वृत्त):- पत्रकारितेतील प्रदीर्घ पर्व म्हणजे रामभाऊ जोशी . सात दशकांचा त्यांचा काळ आदर्श, अभ्यासू आणि निकोप होता. पत्रकारिता त्यांचा श्वास आणि ध्यास  होता. त्यांची ओळख ही निःस्पृह पत्रकार व निगर्वी व्यक्तिमत्व अशी होती," असे विचार माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.

अनिल जोशी लिखित "रामभाऊ जोशी - जीवन प्रवास" या चरित्रग्रंथाचे प्रकाशन डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते एमआयटी डब्ल्यूपीयू च्या संत ज्ञानेश्वर सभागृहात करण्यात आले. या वेळी अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. उल्हासदादा पवार आणि रामभाऊ जोशींचे बंधू व या चरित्रग्रंथाचे लेखक अनिल जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते.

तसेच एमआयटीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. एस. एन. पठाण, प्रा. मिलिंद पात्रे,  विश्वास जोशी, संवित पेंडसे, पश्यंती जोशी, उज्ज्वला भालेराव, राधा जोशी, चैतन्य जोशी, ऋता कांटे, आनंद जोशी, स्नेहा जोशी, अजित जोशी, स्वाती जोशी उपस्थित होते.

 प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,"रामभाऊ एक उत्तम पत्रकार, कुशल संघटक, लेखक, नाट्यसंगीत जाणकार, आस्वादक आणि कार्यकर्ते होते. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात क्रियाशील होते. सेनापती बापट मार्गालगत पत्रकारनगर स्थापनेमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. हसतमुख, हजरजबाबी, निर्गवी रामभाऊ हे होतकरू पत्रकारांचे मार्गदर्शक होते."

डॉ. उल्हासदादा पवार म्हणाले, " सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात रामभाऊंनी पत्रकारितेच्या सात दशकांत अनेक स्थित्यंतरे पाहिली.  निःस्पृह व परखडपणे ते भाष्य करत राहिले. अशा पत्रकारितेची आज आवश्यकता आहे."

 अनिल जोशी म्हणाले," बुद्धिमान, प्रेमळ, जाणकार, निरपेक्ष, व्यासंगी असे अनेक गुणवैशिष्ट्य असलेले व्यक्तिमत्व मला भाऊ म्हणून लाभणे व त्यांच्या चरित्र लिखाणाची संधी मिळणे, हे माझे भाग्य आहे. त्यांचे चरित्र अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल."

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages