कन्हेरगावच्या फौजी ज्ञानदेव डोके यांचा तीन सैन्य पदकांनी सन्मान. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 7, 2026

कन्हेरगावच्या फौजी ज्ञानदेव डोके यांचा तीन सैन्य पदकांनी सन्मान.

 कन्हेरगावच्या फौजी ज्ञानदेव डोके यांचा तीन सैन्य पदकांनी सन्मान.

जम्मू-काश्मीरमध्ये उत्कृष्ट देशसेवा;




टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- जम्मू-काश्मीरसारख्या अत्यंत प्रतिकूल व खडतर भौगोलिक परिस्थितीत तब्बल २ वर्षे ८ दिवस उत्कृष्ट देशसेवा बजावल्याबद्दल कन्हेरगाव (ता. माढा) येथील जवान ज्ञानदेव मनोहर डोके यांना भारतीय सैन्याच्या वतीने तीन मानाचे सैन्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कमांडिंग ऑफिसर यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आल्याने कन्हेरगावसह माढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
        कन्हेरगांव येथील जवान ज्ञानदेव डोके यांनी जम्मू-काश्मीरमधील अतिशय उंच, डोंगराळ आणि आव्हानात्मक भागात कर्तव्य बजावत देशसेवेला प्राधान्य दिले. त्यांच्या उल्लेखनीय सेवेची दखल घेत त्यांना हाय अल्टिट्यूड मेडल, सैन्य सेवा मेडल विथ जम्मू-काश्मीर क्लॅस्प आणि स्पेशल सर्व्हिस मेडल विथ ‘ऑपरेशन रक्षक’ क्लॅस्प अशी तीन पदके प्रदान करण्यात आली.
हाय अल्टिट्यूड मेडल हे अत्यंत उंच व खडतर डोंगराळ भागात निर्धारित कालावधी सेवा बजावणाऱ्या सैनिकांना दिले जाते. तर सैन्य सेवा मेडल विथ जम्मू-काश्मीर क्लॅस्प हे जम्मू-काश्मीरमधील प्रतिकूल हवामान व कठीण परिस्थितीत दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या जवानांच्या योगदानाची दखल घेणारे मानाचे पदक आहे.
तसेच स्पेशल सर्व्हिस मेडल विथ ‘ऑपरेशन रक्षक ' हे  दहशतवादविरोधी मोहिमेसाठी  चालवले गेले होते. या ऑपरेशन रक्षक मोहिमेअंतर्गत ठरवून दिलेला ठराविक सेवा  कालावधी पूर्ण करणाऱ्या जवानांना हे मेडल दिले जाते.
     जवान ज्ञानदेव डोके यांच्या या गौरवामुळे कन्हेरगाव परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या देशसेवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावत देशाच्या सुरक्षेसाठी योगदान देणाऱ्या डोके यांच्या कार्याचा गावकऱ्यांना विशेष अभिमान असल्याची भावना कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांनी व्यक्त केली आहे.
भारतीय सैन्याच्या गणवेशातील कन्हेरगावच्या सुपुत्राचा हा सन्मान संपूर्ण माढा तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला असल्याचे मत जवान ज्ञानदेव डोके यांचे वडील मनोहर डोके , आई नागरबाई डोके , बंधू सोमनाथ डोके , कृषी सहाय्यक सचिन डोके , पांडुरंग डोके , नामदेव डोके , औदुंबर डोके , चुलते नागनाथ डोके , कुंडलीक डोके, सदाशिव डोके यांनी व्यक्त केले आहे ‌.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages