ज्येष्ठांच्या सर्व संघटनाच्या एकाच राष्ट्रीय व्यासपीठासाठी जगन्नाथ मोरे - पाटील यांनी पुढाकार घ्यावा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 15, 2026

ज्येष्ठांच्या सर्व संघटनाच्या एकाच राष्ट्रीय व्यासपीठासाठी जगन्नाथ मोरे - पाटील यांनी पुढाकार घ्यावा

 ज्येष्ठांच्या सर्व संघटनाच्या एकाच राष्ट्रीय व्यासपीठासाठी जगन्नाथ मोरे - पाटील यांनी पुढाकार घ्यावा







आटपाडी(कटूसत्य वृत्त):-  अनेक ठिकाणच्या लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशाला हलवून सोडले आहे . त्याच सारखे लाखोंच्या संख्येतले निर्णायक, प्रदिर्घ आंदोलन देशातील ज्येष्टांनी छेडल्यास, ज्येष्ठांना राष्ट्रीय संपत्ती घोषीत करून त्यांचे सर्व प्रश्न सरकार तातडीने सोडविल्याशिवाय राहणार नाही. असे मत सामाजिक कार्यकर्ते सादिक खाटीक व्यक्त केले .
          अर्थक्रांती जीवन गौरव ज्येष्ट नागरीक संघटनेचे प्रदेश समन्वयक जगन्नाथ मोरे - पाटील यांचा शाल बुके देऊन सत्कार केल्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना सादिक खाटीक हे मत मांडले .
          राज्य आणि देशातील ज्येष्ठांच्या शेकडो संस्था, संघटना फोरम, त्यांचे  प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवून इंडिया आघाडी, महाविकास आघाडी, एनडीए आघाडी, महायुती सारखी, देशव्यापी - राज्यव्यापी सर्व विखुरलेल्या ज्येष्ठांच्या संघटनांची एकच आघाडी उभी केल्यास करोडो संख्येने ज्येष्टांना एकाच व्यवस्थे खाली आणणे सर्व सोयीचे होईल, यासाठी जगन्नाथ मोरे - पाटील यांनी राज्य - देश पातळीवरील ज्येष्टांच्या नेतृत्वाशी समन्वय साधावा आणि ही नवव्यवस्था अस्तित्वात येण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन सादिक खाटीक यांनी केले .
          प्रत्येक भारतीय देशाचा विश्वस्त, मालक, राजा आहे . याचा विसर पडल्याने आणि व्यवस्थेने विसर पाडल्याने करोडो भारतीयांची अवस्था दयनीय बनली आहे . सर्व धर्मीयांच्या धार्मिक व्यवस्थांमध्ये, भारतीय बजेटच्या १८ पट जमणारा पैसा शासनाने आपल्या ताब्यात घेतल्यास भारत सर्व स्तरावर १८ पटीने विकास करू शकेल . देशाचे शेकडो प्रश्न निर्णायक रित्या सुटतील , आता ९५ रुपयांना मिळणाऱ्या १ डॉलर, भविष्यात १ रुपयासाठी ९५ डॉलर मोजावे लागण्याइतपत भारत जगात अव्वल बनेल, असेही सादिक खाटीक यांनी स्पष्ट केले .
          ज्येष्टांचे राज्य समन्वयक जगन्नाथ मोरे - पाटील यांना आपल्या सत्काराला उत्तर देताना, संघटनेच्या कार्याचा सविस्तर लेखा जोखा मांडला . संघटनेच्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली . ज्येष्टांना राष्ट्रीय संपत्ती घोषीत करावे, प्रत्येक ज्येष्ट नागरीकांना १०००० सन्मानधन मिळावे , सर्व क्षेत्रात ज्येष्टांना प्राधान्याने सुविधा देणे बंधनकारक करावे . ज्येष्टांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, प्रत्येक कुटुंबात सन्मानधन जाणार असल्याने समाजातील सर्व घटक सर्वसंपन्न बनतील . ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत बनल्याने लाखो करोडो परिवार खेड्यात, गावात आनंदाने स्थिरावतील . त्यामुळे शहरेही सुस्कारा टाकतील आणि भारत बलवान बनेल . अशा भावना व्यक्त केल्या .
           आटपाडीतील ज्येष्टांनी काही महिन्यांपासून घेतलेली गती सर्वांना प्रेरणादायी ठरत असल्याचेही जगन्नाथ मोरे - पाटील यांनी यावेळी आवर्जून सांगीतले .
          प्रारंभी स्वागत अरविंद चांडवले त्यांनी तर प्रास्ताविक भास्करराव गायकवाड यांनी केले .
          यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भास्करराव गायकवाड, अरविंद चांडवले, प्रा . दिलीप सपाटे, तानाजीराव घाडगे, दत्तात्रय मोकाशी, पोपटराव उर्फ विठ्ठलराव देशमुख, प्रकाश साळुंखे, अनिलराजे देशमुख, मुरलीधर ननवरे, बाळासाहेब गायकवाड, अशोक उकीरडे, महादेव कोळी, रामचंद्र भिसे, दत्तात्रय माळी इत्यादी अनेक जण उपस्थित होते . शेवटी दिलीपराव सपाटे यांनी आभार मानले .

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages