संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नहयान यांचे मुंबई विमानतळावरून प्रयाण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 21, 2026

संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नहयान यांचे मुंबई विमानतळावरून प्रयाण

 

संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नहयान यांचे मुंबई विमानतळावरून प्रयाण



मुंबई(कटूसत्य वृत्त):-  संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान तथा परराष्ट्र मंत्री महामहिम शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नहयान आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढील कार्यक्रमासाठी प्रयाण झाले.

यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नहयान यांच्याशी हस्तांदोलन करून त्यांना निरोप दिला.

याप्रसंगी भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव (गल्फ) आसीम महाजन, सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे, मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, मुंबई उपनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र बोंबले यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages