दासावा मध्ये विद्यार्थ्यांसमवेत वाचन प्रेरणा दिन
मुंबई(कटूसत्य वृत्त):- दादर सार्वजनिक वाचनालय आणि काशिनाथ धुरू ट्रस्टस हॉल यांच्या वतीने आज छबिलदास शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समवेत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. यावेळी दासावा प्रमुख्य कार्यवाह कामथे मॅडम यांच्यासह पदाधिकारी, पाठक मॅडम यांच्यासह कर्मचारीवर्ग आणि शेकडो विद्यार्थी हजर होते. दरवर्षी दासावाच्या वतीने \१५ ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ आणि मुलांचे लाडके व्यक्तिमत्त्व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा हा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या समवेत साजरा करण्यात येतो.
मुलांना छान छान चित्रांची पुस्तके पाहायला आवडतात, परी, राजकुमार, जंगलातील प्राणी आणि शूरवीरांच्या गोष्टी वाचायला आवडतात. आज बालवाडी ते चौथी पर्यंतच्या वर्गातील मुलांनी स्टेजवर येऊन सुरेल आवाजात गाणी म्हणाले, गोष्टी सांगितल्या, आणि बोधकथेतून आपला विचार व्यक्त केला, अर्थात त्यात डॉ अब्दुल कलाम यांच्या जीवनाचे सार आणि वाचनाचे महत्त्व त्यांच्या विचारामध्ये होते. भरगच्च हॉलमध्ये मुलांमध्ये धाडस वाखाणण्यासारखे होते.
यावेळी श्रीमती शुभा कामथे मॅडम या आपले विचार मांडताना म्हणाल्या की, मोबाईलच्या अतिवापराच्या युगात पुस्तक वाचल्यामुळे आपल्याला नवीन शब्द समजतात, आपली भाषा सुधारते, कल्पनाशक्ती वाढते आणि आत्मविश्वासही वाढतो. मुलांना गोष्टींची पुस्तके आनंद देतात, तर विज्ञानाची पुस्तके प्रश्न विचारायला आणि उत्तरे शोधायला शिकवतात. आज हा संदेश मुले घरी घेऊन गेलीत तरी पुरे. पुस्तक वाचणारे मूल विचार करायला शिकते, विचार करणारे मूल नवे शोध लावते आणि नवे शोध लावणारे मूल देशाचे भविष्य घडवते. याप्रसंगी प्रमुख सुनील वाकडे सर, कार्यक्रम समिती कार्यवाह सुमेधा डोंगरे,कार्याध्यक्ष मनोहर साळवी, सुरेश शिंदे, ग्रंथसमिती समिती प्रमुख राजन भालिंगे, कार्यवाह यतीन कामथे, प्राथमिक मुख्याध्यापिका रॉड्रिक्स ब्लाँची, सूत्रसंचालन विलास कदम सर केले.

No comments:
Post a Comment