सरकारचे 2 मंत्री एमपीएससी आंदोलनस्थळी जाणार! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, October 8, 2026

सरकारचे 2 मंत्री एमपीएससी आंदोलनस्थळी जाणार!

  सरकारचे 2 मंत्री एमपीएससी आंदोलनस्थळी जाणार!




पुणे (कटूसत्य वृत्त):- एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पेपरफुटी प्रकरणावरुन पुण्यात आंदोलन सुरु आहे. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तसेच विद्यार्थ्यांकडून या प्रकरणावरुन एमपीएससीचे विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

विद्यार्थी भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी प्रचंड आग्रही आहेत. विद्यार्थ्यांच्या या मागणीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे महत्त्वाची विनंती देखील केली आहे. यानंतर आता या प्रकरणी आणखी महत्त्वाची अपडेट येत आहे. आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.


रोहित पवार काय म्हणाले?

रोहित पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना उद्देशून उद्या सरकारचे दोन मंत्री आंदोलनस्थळी भेट देणार अशून या प्रकरणी शंभर टक्के तोडगा निघणार असल्याची माहिती दिली. "आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगायची आहे, अंदाज असा आहे की, उद्या दुपारी आपल्या सर्वांना भेटण्यासाठी दोन मंत्री येणार आहेत. शंभर टक्के मार्ग काढला जाईल. हा लढा तुमच्यामुळे आपण लढू शकलो. अनेक नेते पाठिंबा देण्यासाठी आले म्हणून या ठिकाणी लढू शकलो", असं रोहित पवार बुधवारी संध्याकाळी म्हणाले.
विद्यार्थ्यांचे आंदोलक हायजॅक, मुख्यमंत्र्यांचा आरोप

दुसरीकडे, विद्यार्थ्यांचे आंदोलन हायजॅक झाल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. "एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन हे हायजॅक झालेलं आहे. ते आता पूर्णपणे राजकीय नेत्यांचं आंदोलन झालं आहे. एमपीएससीच्या विषयांपेक्षा त्या ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय विषयांवर भाषणं होऊ लागली आहेत. एमपीससीचा विषय असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विषय, देशाचा विषय, वेगवेगळे विषय त्या ठिकाणी येत आहेत, जे पूर्णपणे राजकीय आहेत", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages