उद्योजकांच्या एकजुटीतून समृद्धीकडे वाटचाल; MEA International Business Expo 2027 चा शुभारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 21, 2026

उद्योजकांच्या एकजुटीतून समृद्धीकडे वाटचाल; MEA International Business Expo 2027 चा शुभारंभ

 उद्योजकांच्या एकजुटीतून समृद्धीकडे वाटचाल; MEA International Business Expo 2027 चा शुभारंभ




मा.खा.श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते लाँचिंग सोहळा; आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती

पुणे (कटूसत्य वृत्त):-   Maratha Entrepreneurs’ Association (MEA) यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘MEA International Business Expo 2027’ च्या लाँचिंग सोहळ्याचे उद्घाटन मा.खा.श्री. शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते पुणे येथे उत्साहात पार पडले. या कार्यक्रमास आमदार रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘Let’s Grow Together’ या ध्येयवाक्याने कार्यरत असलेली MEA संस्था उद्योजकांना एकत्र आणून व्यवसायवृद्धी, नेटवर्किंग, ज्ञानाची देवाणघेवाण आणि नवीन व्यावसायिक संधी निर्माण करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे.

यावेळी उपस्थित उद्योजकांशी संवाद साधताना मा.खा.श्री. शरदचंद्र पवार साहेब यांनी महाराष्ट्रातील उद्योजकतेच्या वाढीसाठी अशा व्यासपीठांची आवश्यकता अधोरेखित केली. नव्या पिढीतील उद्योजकांनी पारंपरिक व्यवसायासोबत आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि बदलत्या बाजारपेठेचा स्वीकार करून व्यवसायाचा विस्तार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार रोहित पवार यांनीही यावेळी उपस्थित राहून MEA च्या कार्याचे आणि उद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. नवउद्योजकांना योग्य मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि बाजारपेठेशी जोडण्याचे काम अशा उपक्रमांमधून अधिक प्रभावीपणे होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

MEA International Business Expo 2027 च्या माध्यमातून विविध उद्योगक्षेत्रांतील उद्योजक, व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि ग्राहकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या Expo च्या माध्यमातून उद्योजकांना नवीन बाजारपेठा, व्यवसायविस्ताराच्या संधी, व्यावसायिक भागीदारी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेटवर्किंग उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे.

MEA च्या Women Wing च्या माध्यमातून महिला उद्योजिकांना व्यवसाय क्षेत्रात प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. महिला उद्योजकांचा सहभाग वाढवून त्यांना स्वतंत्र व्यावसायिक ओळख निर्माण करण्यासाठी MEA विशेष प्रयत्न करत आहे.

या कार्यक्रमास MEA चे अध्यक्ष विक्रम गायकवाड, प्रवीणदादा गायकवाड, मा. अध्यक्ष अंकुश आसबे,अरुण निम्हण, नितीन भोसले, विजय गवारे,सई बहिरट सायली काळे,खजिनदार राजेश कुराडे यांच्यासह MEA चे पदाधिकारी, Core Members, विविध Chapter चे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.

‘From Unity to Prosperity’ या संकल्पनेतून उद्योजकांच्या एकजुटीला व्यवसायवृद्धी आणि आर्थिक प्रगतीची दिशा देत महाराष्ट्रातील उद्योजकांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी MEA आगामी काळात अधिक व्यापक उपक्रम राबवणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages