ओंकार ग्रुपला दिलेल्या कर्जा संबंधातील तपशीलवार माहिती द्या - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 22, 2026

ओंकार ग्रुपला दिलेल्या कर्जा संबंधातील तपशीलवार माहिती द्या

ओंकार ग्रुपला दिलेल्या कर्जा संबंधातील तपशीलवार माहिती द्या* 

सहकार शिरोमणी चे माजी संचालक अँड. दीपक पवार यांची डीसीसी बँकेच्या प्रशासकाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी



      

पंढरपूर(कटूसत्य वृत्त):-   सोलापुर जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेतच 

ओंकार साखर कारखाना ग्रुपला दिलेल्या ८७८ कोटी कर्जाची चौकशी व्हावी. अशी मागणी  सहकार शिरोमणी चे माजी संचालक अँड दिपक पवार यांनी लेखी निवेदनाद्वारे केली. 

 या देण्यात आलेल्या निवेदनामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक असताना देखील, एकीकडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामार्फत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी वार्षिक २० लाख रुपये कमाल मर्यादा घातली जाते .परंतू बाहेरून आलेल्या खाजगी उद्योजकला तब्बल ८७८ कोटीचे कर्ज वाटप केले जाते. याबाबत प्रशासक कुंदन भोळे यांना धारेवर धरले.

 या देण्यात आलेल्या कर्जासंबंधी संबंधित कर्जाची संपूर्ण कागदपत्रे देण्याचे व चुकीचे कर्ज वाटप झाले असल्यास दुरुस्ती करण्याचे आश्वासन प्रशासकांनी दिले.
अँड.दीपक पवार यांनी दिलेल्या निवेदनामध्ये विषय क्र.०१ : आपल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून ओंकार साखर कारखाना व त्यांच्या ग्रुपला आजतागायत किती कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे ? त्यांच्याकडून आजपर्यंत किती कर्ज परतफेड करण्यात आली? आजअखेर त्यांच्याकडे असणारी एकूण येणेबाकी किती आहे ? त्यापैकी थकबाकी किती आहे ? कर्ज पुरवठा करताना तारण घेतलेल्या मालमत्तांचा तपशील याबाबतची सविस्तर कागदपत्रे आम्हाला मिळावीत.

: नवीन असणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना वार्षिक केवळ २० लाख रुपयांचीच कर्जवाटपाची जी मर्यादा आहे त्यामध्ये कधी बदल होईल? आमच्या एकूण कर्ज मागणी प्रमाणे त्यांना कर्ज पुरवठा कधी करण्यात येईल? तो करण्यासाठी कोणत्या अडचणी आहेत याची माहिती मिळावी.

 : नवीन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना दरवर्षी जे २० लाख रुपये कर्जवाटपासाठी मंजूर केले जातात यावर्षी अजून त्याबाबतची मंजूरी झालेली नाही तरी कधी पर्यंत ते कर्ज वाटप सुरू होईल याची माहिती मिळावी.

 : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थां किंवा प्रत्यक्ष शेतकरी कर्ज वाटप वगळता दुग्ध संस्था, तसेच खाजगी व सहकारी साखर कारखाने व इतर वेगवेगळे उद्योग यांना आपल्या मार्फत किती कर्ज पुरवठा करण्यात आलेला आहे, त्याची वसूली बाबतची सद्यस्थिती काय आहे व त्यामध्ये थकबाकी किती प्रमाणात आहे त्याची देखील तपशीलवार माहितीची कागदपत्रे आम्हाला मिळावीत. अशी मागणी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages