शहराच्या विकासासाठी भरघोस निधी देणार आमदार राजू खरे यांची ग्वाही - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 22, 2026

शहराच्या विकासासाठी भरघोस निधी देणार आमदार राजू खरे यांची ग्वाही

 शहराच्या विकासासाठी भरघोस निधी देणार आमदार राजू खरे यांची ग्वाही

प्रभाग नऊ मध्ये नमो उद्यानाचे आमदार राजू खरे यांच्या हस्ते शुभारंभ





मोहोळ (कटूसत्य वृत्त):-  शहराचा विकास रस्ते, इमारती किंवा उद्योग यापुरता मर्यादित नसतो, तर नागरिकांच्या जीवनमानात आनंद, आरोग्य आणि समाधान वाढवणाऱ्या सुविधा देखील निर्माण होणे आवश्यक असते. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या माध्यमातून अत्याधुनिक सोईसुविधा असलेले उद्यान प्रभाग क्रमांक 9 मध्ये निर्माण होणार असून नमो उद्यानातून मोहोळ शहराच्या वैभवात अधिक भर पडेल, असे प्रतिपादन मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांनी केले.

मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक 9 मध्ये नगरसेविका सरताज सरफराज सय्यद यांच्या प्रयत्नातून भव्य दिव्य अशा उभारण्यात येणाऱ्या उद्यानाचे शुभारंभ रविवार 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वा. करण्यात आले. या उद्यानाचे भूमिपूजन होळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आले.  

शहरात मुलभूत सुविधांबरोबरच शहराचा शाश्वत विकास आम्‍ही करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. नमो उद्यानात खुली व्‍यायाम शाळा, मुलांचे खेळाचे साहित्‍य, व्‍यासपीठ, योगासाठी बैठक व्‍यवस्‍था, चालण्यासाठी वॉकिंग ट्रॅक केला जाणार आहे. शहराच्‍या दक्षिण भागाच्‍या विकासाची सुरुवात यामुळे होणार असून या उद्यानामुळे शहराच्या विकासात भर पडणार आहे. 

यावेळी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब गायकवाड, पद्माकर आप्पा देशमुख, विकी देशमुख, सरफराज सय्यद, नगरसेवक चैतन्य देशमुख, सचिन जाधव, दिलीप गायकवाड, सुमित पवार, बापू आठवले, समजीक कारंडे, बाळासाहेब कारंडे, दीपक मडीखांबे,शाबाज शेख, जमीर शेख, सद्दाम शेख, अमीर शेख, नूर हुसेन शेख, किरण पोपळकर, नागेश पवार, सुदाम शिंगाडे, शाकीर मुजावर, नवाज शेख, वसीम हरणमरे, सद्दाम तवक्कल इत्यादी मान्यवरासह प्रभाग क्रमांक नऊ, गुलमोहर पार्क आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्‍थित.



चौकट
 प्रभाग क्रमांक नऊच्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवत नगरसेवक होण्याची संधी दिली दिलेल्या संधीतून प्रभागाचा विकास कसा होईल या हेतूने प्रभागाच्या विकासासाठी आमदार राजू खरे यांच्या माध्यमातून प्रभागासाठी निधी इथून घेऊन प्रभागातील विकास कामे करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 

 सरताज सरफराज सय्यद
नगरसेविका मोहोळ नगरपरिषद


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages