"शिक्षक आणि शाळांचा गौरव हा समाजाच्या भविष्याचा सन्मान आहे" – प्रशासनाधिकारी मल्हारी माने
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- "विद्यार्थी घडवण्यात आणि समाजाला दिशा देण्यात शिक्षकांचे योगदान अतुलनीय आहे. अशा उपक्रमशील शिक्षक आणि आदर्श शाळांचा गौरव करणे म्हणजे केवळ त्यांचा सत्कार नव्हे, तर समाजाच्या उज्ज्वल भविष्याचा सन्मान आहे," असे गौरवद्गार महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने साहेब यांनी काढले. अशी माहिती साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेचे संचालक सुनील चव्हाण यांनी दिली.
साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर यांच्या वतीने आयोजित उपक्रमशील मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक, सेवाभावी सेवक व आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. अशोक चौक येथील लोटस मल्टिपर्पज हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
याप्रसंगी व्यासपीठावर नरेंद्र गंभीरे, चंद्रकांत अवताडे,मनिष बांगर,संजय साळुंके, राजेंद्र कुलकर्णी, आणि पोलीस उपनिरीक्षक,गुलाब मुल्ला, संतोष माशाळे,सोमेश्वर याबाजी गोपीचंद राठोड, मनोज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यांना मिळाला मानाचा पुरस्कार:
समारंभात सौ. ज्ञानेश्वरी संगीतराव (उपक्रमशील मुख्याध्यापिका), सुगंधा कांबळे, . प्राजक्ता भोसले, सविता फडतरे, उषा क्षीरसागर, . सपना पावाडे (गुणवंत शिक्षिका), श्री. बलराज धजाल (सेवाभावी सेवक) आणि ज्ञानगंगा प्राथमिक मराठी विद्यालय, मजरेवाडी (आदर्श शाळा) यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्थेचे चेअरमन उल्हास बिराजदार, सचिव अप्पाराव इटकेर, फरजाना रचभरे, महादेवी पाटील, वीरभद्र यादवाड विनोद आगलावे भीमराया कापसे, भाऊसाहेब मोरे, शिवानंद हिरेमठ व जयंत गायकवाड विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्लाउद्दीन शेख यांनी केले.
*फोटो ओळी--- साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेच्या वतीने पुरस्कार प्राप्त शिक्षक व मान्यवर*

No comments:
Post a Comment