चिमुकली सानिकाच्या आकर्षक रांगोळीने वेधले लक्ष; गौरी-गणपतीपुढे साकारले माहेरवाशीण गौरीचे सुंदर रूप
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- गौरी-गणपती सणाचे औचित्य साधून टेंभुर्णी येथील कुमारी सानिका धनंजय भोसले हिने साकारलेल्या आकर्षक व कलात्मक रांगोळीने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सानिकाने आपल्या कलाकुसरीतून साडी परिधान केलेल्या महिलेचे, माहेरवाशीण गौरीचे मनमोहक रूप रांगोळीत साकारले असून, तिच्या या सुंदर कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गौरी-गणपती हा महाराष्ट्रातील पारंपरिक आणि श्रद्धेचा सण असून, या सणानिमित्त प्रत्येक घरात विविध धार्मिक कार्यक्रमांसह सजावट, रांगोळी आणि पूजाविधीचे आयोजन केले जाते. याच पार्श्वभूमीवर सानिकाने गौरी-गणपतीपुढे अत्यंत सुबक, आकर्षक आणि कलात्मक रांगोळी काढली. या रांगोळीमध्ये साडीतील महिलेचे रूप, चेहऱ्यावरील भाव आणि रंगसंगती यांचा सुंदर मिलाफ साधण्यात आला आहे. तसेच रांगोळीत ‘गौरी गणपती’ असा उल्लेख करून सणाचे महत्त्वही अधोरेखित केले आहे.
कुमारी सानिका भोसले हिला लहानपणापासूनच रांगोळी काढण्याची विशेष आवड आहे. विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने ती आपल्या कल्पकतेचा आणि कलागुणांचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक रांगोळ्या साकारत असते. दरवर्षी गौरी-गणपती सणाच्या निमित्ताने ती नवीन संकल्पना आणि कलात्मक रचनांमधून आपली कला सादर करते. यंदाच्या रांगोळीतूनही तिची कल्पकता, बारकाव्यांकडे लक्ष देण्याची सवय आणि कलाकुसर दिसून आली आहे.
सानिकाने साकारलेल्या या रांगोळीमुळे गौरी-गणपतीच्या सजावटीला विशेष आकर्षण प्राप्त झाले असून, रांगोळी पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकडून तिचे कौतुक केले जात आहे. लहान वयातच कलेची आवड जोपासत सानिका आपल्या कलागुणांना वाव देत असल्याने तिच्या या प्रयत्नाचे विशेष महत्त्व आहे.
कुमारी सानिका धनंजय भोसले ही टेंभुर्णी पत्रकार धनंजय भोसले यांची कन्या आहे. सानिकाच्या या सुंदर कलाकृतीचे टेंभुर्णी परिसरातून सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, अशी भावना व्यक्त केली जात आहे. तिच्या रांगोळी कलेतून सण-उत्सवांतील पारंपरिक संस्कृती आणि सर्जनशीलतेचे सुंदर दर्शन घडले आहे.

No comments:
Post a Comment