केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर स्वागत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 15, 2026

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर स्वागत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई विमानतळावर स्वागत





मुंबई (कटूसत्य वृत्त):-   केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे आज पहाटे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार अमित साटम, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव चंद्रकांत मोरे यांनीही याप्रसंगी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे स्वागत केले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages