ज्ञानयात्री आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रा. हनुमंत चोरमले सन्मानित - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 15, 2026

ज्ञानयात्री आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रा. हनुमंत चोरमले सन्मानित

 ज्ञानयात्री आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने प्रा. हनुमंत चोरमले सन्मानित




टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):-  न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, टाकळी येथील क्रीडा शिक्षक प्रा. हनुमंत लक्ष्मण चोरमले यांना त्यांच्या उल्लेखनीय क्रीडा कार्याची दखल घेत ‘ज्ञानयात्री आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार’ देऊन रविवार, दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी कुर्डूवाडी येथे सन्मानित करण्यात आले. स्वेरीचे प्रमुख आदरणीय बी. पी. रोंगे सर यांच्या मार्गदर्शनातून सोलापूर जिल्ह्यातील आदर्श शाळा, आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक तसेच आदर्श क्रीडा शिक्षक यांचा गौरव करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात प्रा. हनुमंत चोरमले सर यांना क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या दीर्घकाळच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.
प्रा. चोरमले सर यांनी टाकळी परिसरातील विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांचे मार्गदर्शन करून त्यांच्यातील क्रीडागुणांना योग्य दिशा देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेषतः ग्रीको-रोमन कुस्ती या क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्यांच्याच मार्गदर्शनाखालील अभिमन्यू संजय चौधरी या विद्यार्थ्याने सन २०२५ मध्ये राष्ट्रीय स्तरावर (नॅशनल) सहभाग नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली. अनेक विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देऊन त्यांना स्पर्धात्मक पातळीवर पोहोचविण्यामध्ये प्रा. चोरमले सर यांचा मोलाचा वाटा असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राची आवड निर्माण करणे, त्यांच्यातील सुप्त क्रीडागुण ओळखणे, नियमित सराव, शिस्त आणि सातत्याच्या माध्यमातून त्यांना विविध स्पर्धांसाठी तयार करणे, या कार्यासाठी प्रा. चोरमले सर सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी विविध स्तरांवर आपल्या शाळेचे, गावाचे आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल करीत आहेत. त्यामुळे त्यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरव मानला जात आहे.
प्रा. हनुमंत चोरमले यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आदरणीय बबनदादा शिंदे, दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह शिंदे, संस्थेचे अध्यक्ष विक्रमदादा शिंदे, मुख्याध्यापक सुरवसे सर, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भारत माने सर, माढा तालुक्यातील क्रीडा क्षेत्रातील अग्रेसर श्री. अर्जुनराव खटके सर, सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, टाकळी ग्रामस्थ तसेच पालकांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

चौकट : क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल

प्रा. हनुमंत चोरमले सर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्तरांवर यश मिळविले असून, ग्रीको-रोमन कुस्तीतील अभिमन्यू संजय चौधरी याची २०२५ मध्ये राष्ट्रीय स्तरावरील कामगिरी ही त्यांच्या क्रीडा मार्गदर्शनाची ठळक उदाहरणांपैकी एक आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages