दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात लवकरच अद्ययावत वैद्यकीय कक्ष – मंत्री प्रकाश आबिटकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 24, 2026

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात लवकरच अद्ययावत वैद्यकीय कक्ष – मंत्री प्रकाश आबिटकर

 

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात लवकरच अद्ययावत वैद्यकीय कक्ष – मंत्री प्रकाश आबिटकर



 मुंबई(कटूसत्य वृत्त):-   दिल्ली येथे कामानिमित्त जाणाऱ्या महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, मान्यवर तसेच नागरिकांना तातडीच्या प्रसंगी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात अद्ययावत वैद्यकीय कक्ष उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या कक्षामध्ये प्राथमिक वैद्यकीय तपासणी, आवश्यक वैद्यकीय चाचण्या, प्राथमिक निदान आणि औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या सुविधेसाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आरोग्य भवन येथे नुकतीच बैठक घेऊन प्रस्तावित वैद्यकीय कक्षाच्या उभारणीबाबत आढावा घेण्यात आला.

प्रस्तावित वैद्यकीय कक्षासाठी आवश्यक सुविधा, जागा, मनुष्यबळ, वैद्यकीय उपकरणे आणि इतर बाबींची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आरोग्यसेवा आयुक्त दिल्ली येथे जाऊन महाराष्ट्र सदनाची पाहणी करणार आहेत. पाहणीनंतर आवश्यक त्या सुविधांचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. या सुविधेसाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करून मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर वैद्यकीय कक्षाच्या उभारणीच्या कार्यवाहीला गती देण्यात येणार आहे. आरोग्य भवन, मुंबई येथे झालेल्या बैठकीत महाराष्ट्र सदनातील प्रस्तावित वैद्यकीय कक्षाच्या रचनेची, आवश्यक वैद्यकीय सुविधा आणि प्रशासकीय कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस आरोग्य विभागाचे सचिव ई. रवींद्रन, आरोग्यसेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. दिलीप माने यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages