तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत कल्याणशेट्टी शाळेचा घवघवीत यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 22, 2026

तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत कल्याणशेट्टी शाळेचा घवघवीत यश

 तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत कल्याणशेट्टी शाळेचा घवघवीत यश



अक्कलकोट(कटूसत्य वृत्त):-     येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत कल्याणशेट्टी माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. विविध योगासन प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
ट्रॅडिशनल योगासन प्रकारात १४ वर्षे मुलांमध्ये नरेंद्र रवींद्र कालीबत्ते व श्रीरंग गणेश फडतरे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. १४ वर्षे मुलींमध्ये भक्ती सिद्धाराम मोरडे- प्रथम, गौरी भीमाशंकर कामाठी- द्वितीय, वैष्णवी सुरेशकुमार माशाळे- तृतीय क्रमांक मिळवला. १७ वर्षे मुलांमध्ये शुभंकर अनंत मसलेकर प्रथम तर वीरेंद्र विजयकुमार जोजन द्वितीय क्रमांकावर राहिले. १७ वर्षे मुलींमध्ये सिद्धी देविदास बाबर प्रथम व लक्ष्मी खिरानंद कणगी द्वितीय क्रमांकावर राहिल्या.
रिदमिक योगासन प्रकारात १४ वर्षे मुलींमध्ये सोनाली विजय म्हेत्रे व कीर्तीकी सुरेश कवटगी यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. १४ वर्षे मुलांमध्ये श्रीरंग गणेश फडतरे प्रथम व नरेंद्र रवींद्र कालीबत्ते द्वितीय क्रमांकावर राहिले. १७ वर्षे मुलांमध्ये कार्तिक सचिन रामशेट्टी प्रथम व विनायक मल्लिनाथ बगलेपाटील द्वितीय क्रमांकावर राहिले.
आर्टिस्टिक सिंगल प्रकारात १४ वर्षे मुलींमध्ये भक्ती सिद्धाराम मोरडे, तर १७ वर्षे मुलींमध्ये सिद्धी देविदास बाबर यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
आर्टिस्टिक पेयर प्रकारात १४ वर्षे मुलींमध्ये भक्ती सिद्धाराम मोरडे व लक्ष्मी मारुती धर्मसाले, तर १७ वर्षे मुलींमध्ये धनश्री परमेश्वर पोलासे व फायका आसिफ बेग यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवला. १७ वर्षे मुलांच्या गटात कार्तिक सचिन रामशेट्टी व विनायक मल्लिनाथ बगलेपाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
 वरील सर्व यशस्वी विद्यार्थी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत पात्र झाले आहेत.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्रीशैल किणगी, कुमार जाधव,योग प्रशिक्षक चंद्रकांत बिराजदार यांचे कौतुकासह अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages