सरस्वती अकॅडमी ऑफ अकौंटन्सी च्या श्री गणेशाचे पालखी मिरवणुकीने विसर्जन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, September 26, 2026

सरस्वती अकॅडमी ऑफ अकौंटन्सी च्या श्री गणेशाचे पालखी मिरवणुकीने विसर्जन

 सरस्वती अकॅडमी ऑफ अकौंटन्सी च्या श्री गणेशाचे पालखी मिरवणुकीने विसर्जन



सोलापूर  (कटूसत्य वृत्त):- सरस्वती अकॅडमी ऑफ अकौंटन्सी, साखर पेठ, सोलापूर येथे गणेशोत्सव २०२६ उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवानिमित्त अकॅडमीतर्फे श्री गणेशाची भक्तिभावाने स्थापना करण्यात आली होती.

गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर, २०२६ रोजी श्री गणेश विसर्जन भव्य पालखी

मिरवणुकीचे आयोजन करून करण्यात आले. यावेळी श्री गणेशाची आरती करून सर्वांनी गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.

श्री गणेशाच्या पालखीची आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांची आरास, भगवे ध्वज व विविध सजावटींमुळे मिरवणुकीला विशेष आकर्षण प्राप्त झाले. ढोल-ताशांच्या गजरात व 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर

या' च्या जयघोषाने ही मिरवणूक उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत उत्सवाची शोभा वाढवली.

संपूर्ण मिरवणूक उत्साह, शिस्त आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडली.

मिरवणुकीमध्ये अकॅडमीचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मिरवणुकीचे नियोजन सरस्वती अकॅडमी ऑफ अकौंटन्सीचे संचालक प्रा. मल्लिकार्जुन परळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages