२०२५–२६चे जीपीएफ खाते विवरणपत्र संकेतस्थळावर उपलब्ध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 19, 2026

२०२५–२६चे जीपीएफ खाते विवरणपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

२०२५–२६चे जीपीएफ खाते विवरणपत्र संकेतस्थळावर उपलब्ध




मुंबई(कटूसत्य वृत्त):-    महालेखापाल (लेखा व हक्‍कदारी)-१, महाराष्ट्र, मुंबई यांच्या कार्यालयाने वर्ष २०२५–२६साठीच्या सामान्य भविष्य निर्वाह निधीच्या (जीपीएफ) खाते विवरणपत्र लेखा व कोषागारे संचालकांकडे उपलब्ध करून दिल्या आहेत. ही खाते विवरणपत्रे महाराष्ट्र शासनाच्या सेवार्थ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

जीपीएफ खातेदारांना त्यांची खाते विवरणपत्र संकेतस्थळावर पाहता येतील. https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. सामान्य प्रशासन विभागाच्या ११ जून २०२० रोजीच्या शासन निर्णयानुसार, वर्ष २०१९–२० पासून जीपीएफ विवरणपत्रांच्या छापील प्रती देण्याची पद्धत बंद करण्यात आली आहे.

खाते विवरणपत्र जमा अथवा वजा नोंदी, जन्मतारीख किंवा नियुक्तीची तारीख याबाबत काही तफावत आढळल्यास, संबंधित खातेदारांनी ती बाब आपल्या संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यामार्फत महालेखापाल(लेखा व हक्‍कदारी)-१, महाराष्ट्र, मुंबई येथील वरिष्ठ उपमहालेखापाल(निधी) यांच्या निदर्शनास आणून द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

खाते विवरणपत्रात आवश्यक तपशील नमूद नसल्यास, संबंधित माहिती अभिलेखांची पडताळणी व नोंदींचे अद्ययावतीकरण करण्यासाठी महालेखापालांच्या कार्यालयाकडे पाठवावी. तफावतींचा तपशील agaemaharashtra1@cag.gov.in या ई-मेल पत्त्यावरही पाठविता येईल असे वरिष्ठ उपमहालेखापाल (निधी) यांनी कळविले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages