राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मुंबईतील स्मारकासाठी उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 19, 2026

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मुंबईतील स्मारकासाठी उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या मुंबईतील स्मारकासाठी उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक





 मुंबई(कटूसत्य वृत्त):-  राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यासाठी विधान भवनात उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय समितीची बैठक झाली. मुंबईस्थित कोल्हापूरकरांची गेल्या ५० वर्षांपासूनची मागणी विचारात घेऊन या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या स्मारकासाठी विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी पुढाकार घ्यावा, असा निर्णय समितीच्यावतीने यावेळी घेण्यात आला.

बैठकीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, आमदार अजय चौधरी, आमदार सुनील शिंदे, आमदार राजेंद्र यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके तसेच कोल्हापूर जिल्हा फेडरेशन मुंबईचे अध्यक्ष सूर्यकांत कडाकणे आणि पदाधिकारी उपस्थित होते. स्मारकासाठी योग्य जागा निश्चित करून बृहन्मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र देण्याच्या सूचना मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिल्या.

“राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकासाठी पुढाकार घेण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे,” अशी भावना यावेळी विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी व्यक्त केली.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages