प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने अकलूज येथे भव्य आट्यापाट्या स्पर्धेचे आयोजन
यास्पर्धेस राज्यातील मुंबई, उस्मानाबाद, पंढरपूर, माढा, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, माळशिरस यासह विविध भागातील अनेक संघांनी सहभाग घेऊन ग्रामीण भागातील अस्सल मर्दानी खेळाचा आनंद लुटला आहे व भरघोस बक्षिसे मिळविली आहेत.
या स्पर्धेसाठी भव्य अशी १ लाख ३० हजार रु.ची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकास रुपये ४४ हजार, द्वितीय क्रमांकास रुपये ३३ हजार, तृतीय क्रमांकास रुपये २२ हजार, चतुर्थ क्रमांकास रुपये ११ हजार तर उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या ४ संघास प्रत्येकी रुपये ५ हजारा चे बक्षीस देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहभागी संघास रुपये पाचशे अशी नाममात्र प्रवेश फी ठेवण्यात आली आहे. तसेच सहभागी खेळाडूंना मंडळाच्या वतीने मोफत भोजनाची सोय करण्यात आली आहे.
या स्पर्धेमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी ९८६०३३१७१७ व ९३२५२५२९९६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाचे सचिव बिभीषण जाधव यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील, स्पर्धा प्रमुख भीमाशंकर पाटील, सुभाष चव्हाण, संचालक व सदस्य उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment