मनोरमा बँकेची वार्षिक सभा उत्साहात; सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मनोरमा को-ऑप. बँक आणि मनोरमा मल्टीस्टेटची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी बँकेच्या सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
शनिवारी, होटगी रस्त्यावरील हॉटेल बालाजी सरोवर येथे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बँकेची तर मनोरमा मल्टीस्टेटची सभा चेअरमन शोभा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली.व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे, डॉ. सुमित मोरे, डॉ. मिताली मोरे, डॉ. ऋचा पाटील, डॉ. आदित्य पाटील, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन ॲड. सुरेश गायकवाड, संचालक सुहास भोसले, गणपत कदम, सत्यवान वाघचौरे, डॉ. सत्यजित वाघचौरे, दत्तामामा मुळे, संतोष मोटे, सीए मोईनुद्दीन नदाफ, प्रशांत शहापूरकर तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
प्रारंभी भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापालिकेतील सभागृह नेते नरेंद्र काळे, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी आणि संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा कुलकर्णी यांनी बँकेच्या कामकाजाचा अहवाल सभेसमोर सादर केला. सभेतील विविध विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली डॉ. ऋचा पाटील यांनी विषयाचे वाचन करताना सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला.
मनोरमा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर मनोरमा मल्टीस्टेटची सर्वसाधारण सभाही याच ठिकाणी पार पडली. यावेळी चेअरमन शोभा मोरे, संचालक मंडळाचे सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कविता कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
चौकट....
किरण माने यांना जीवनगौरव
मनोरमा साहित्य मंडळी, मनोरमा बँक परिवार आणि मनोरमा मल्टीस्टेट परिवाराच्या वतीने सिनेअभिनेते व नाट्यकलाकार किरण माने यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. एक लाख रुपयांचा रोख धनादेश, सन्मानचिन्ह, स्मृतिचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप होते
.png)
No comments:
Post a Comment