श्री. भैरवनाथ देवस्थानच्या विकासासाठी खा. शिंदे यांचे मंत्री शंभूराजे देसाई यांना निवेदन
यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मंत्री शंभूराजे देसाई यांनी निवेदनाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत विकासकामांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
श्री. भैरवनाथ देवस्थान हे ग्रामीण तीर्थक्षेत्रांतर्गत ‘ब’ दर्जा प्राप्त महत्त्वाचे धार्मिक स्थळ असून, सोलापूर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. देवस्थानचा धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्यासोबतच भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध पायाभूत विकासकामे करणे गरजेचे आहे.
देवस्थान परिसरात शौचालय, पाणीपुरवठा, संरक्षण भिंत, पेव्हर ब्लॉक, वाहनतळ तसेच इतर आवश्यक विकासकामे करण्यासाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
देवस्थान परिसरात आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासोबतच सरकोली परिसरातील धार्मिक पर्यटनालाही चालना मिळणार आहे. मंत्री शंभूराजे देसाई यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सरकोली ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी विलास श्रीरंग भोसले, माजी पोलीस अशोक दशरथ भोसले, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन लक्ष्मण वसुदेव भोसले, भैरवनाथ तालीम संघाचे वस्ताद नागनाथ तुकाराम कराळे, ऋषिकेश गोपाळ डिंगरे यांच्यासह इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment