सनराईज क्लब च्या सामाजिक उपक्रमाचा इतरांनी आदर्श घ्यावा- मा.ना. राजन पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 10, 2026

सनराईज क्लब च्या सामाजिक उपक्रमाचा इतरांनी आदर्श घ्यावा- मा.ना. राजन पाटील

 सनराईज क्लब च्या सामाजिक उपक्रमाचा इतरांनी आदर्श घ्यावा- मा.ना. राजन पाटील 

माजी आमदार यशवंत माने यांची उपस्थिती



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या यांच्या जयंतीनिमित्त सनराईज क्लबच्या वतीने घेण्यात 
आलेल्या मानवी शरीरातील महत्त्वाचा डोळा हा महत्त्वाचा अवयव आहे त्यासाठी डोळे तपासणी व उपचार आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे नवीन एनसीएमसी कार्ड काढणे  शिबिर व प्रधानमंत्री आवास योजना शहरी हे ए.एच.पी घरकुल अर्ज भरणे सामाजिक उपक्रम राबवून सनराइज क्लबच्या माध्यमातून  या क्लबचा आदर्श इतरांनी घ्यावा महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे मा.ना राजन पाटील.


लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि लोकनेते बाबुरांना पटले यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ शहरात सोमवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी नगरसेवक मुस्ताक शेख उपनगराध्यक्ष दत्तात्रय खवळे यांच्या मार्गदर्शनाखाली सनराइज क्लबच्या वतीने नेत्र तपासणी व उपचार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे एनसीएमसी कार्ड काढण्याचे शिबिर घेण्यात आले. त्या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांतून मिळाला. यावेळी प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नगरसेवक मुस्ताक शेख यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले


लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आणि लोकनेते बाबूराव अण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष मा.ना राजन पाटील तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार यशवंत माने उपस्थित. माजी जि प सदस्य शहाजहान शेख पोलीस निरीक्षक दीपक पाटील, होते.

यावेळी उपस्थित उपनगराध्यक्ष दत्तात्रय खवळे नगरसेवक सतीश काळे बापू डोके, सुशील भैया क्षीरसागर, विक्रम फडतरे, संतोष सुरवसे, अझरुद्दीन कुरेशी, नगरसेविका शहनाज तलफदार, नगरसेविका शाहिस्ता परवीन मुस्ताक शेख, राजू सुतार, वैभव गुंड, राजाराम वाघमारे, चंद्रकांत देवकते, डॉ. वसीम शेख, हेमंत गरड, उद्योजक खाजाभाई शेख डॉ. नसीर खान श्री बरे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हाफिज सादिक इनामदार, समीर शेख, फरिद ईनामदार, आरिफ शेख, इरफान शेख, आसिफ शेख, रवी डोकडे, सागर स्वामी, मोहम्मद (बॉस) शेख, विजय लवटे,  हुजेफ शेख, कयूम शेख, शोएब शेख, उमेश कांबळे, कैमोद्दीन शेख, फारुख बागवान, मुजम्मिल हुंडेकरी, शाहिद शेख, सुफियान शिकलकर, मोईन शेख, साकिब आतार, साकिब शेख, जुबेर शेख, आयान तांबोळी सनराईज क्लबचे आणि ए बी एस ग्रुपचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. 



चौकट

फक्त निवडणुका पुरतच नाही तर राजकारणाविरहित समाजकारण करणे आमचे नेते आदेशाने महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. राजन पाटील माजी आमदार यशवंत तात्या माने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विविध सामाजिक उपक्रम राबवत आलो आहोत. त्यामध्ये डोळे तपासणी शिबिर, गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, रक्तदान शिबिर, अन्नदान पाणीटंचाईच्या काळात पाणीवाटप असे सामाजिक उपक्रम राबवत आलो आहोत. करत असलेल्या कार्यक्रमांना नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल त्यांचेच मनःपूर्वक आभार. या पुढील काळातही असे सामाजिक उपक्रम करत राहू त्यामध्येही नागरिकांनी सहभाग घ्यावा ही विनंती.

मुस्ताक शेख 
मा. नगरसेवक

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages