एन. बी. नवले सिंहगड महाविद्यालयातील प्रा. अझहरुद्दीन शेख यांना पीएच.डी. - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 19, 2026

एन. बी. नवले सिंहगड महाविद्यालयातील प्रा. अझहरुद्दीन शेख यांना पीएच.डी.

 एन. बी. नवले सिंहगड महाविद्यालयातील प्रा. अझहरुद्दीन शेख यांना पीएच.डी.




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक तथा आयक्यूएसी समन्वयक अझहरुद्दीन कुतुबुद्दीन शेख यांनी यांत्रिक अभियांत्रिकी विषयातील पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

‘सेमी-सॉलिड आणि सॉलिड ल्युब्रिकंट्सच्या निवड, स्थिती निरीक्षण आणि दोष निदानासाठी नियमाधारित तज्ज्ञ प्रणालीचा विकास’ या विषयावर त्यांनी संशोधन केले. कोनेरू लक्ष्मय्या एज्युकेशन फाउंडेशन (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) येथून त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली. त्यांच्या संशोधनासाठी डॉ. डी. व्ही. ए. रामा शास्त्री यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रा. अझहरुद्दीन शेख यांच्या संशोधन कार्याची दखल घेत त्यांचे एक उपयुक्तता पेटंट प्रकाशित झाले आहे. अध्यापनासोबतच संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेली ही उल्लेखनीय कामगिरी महाविद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

या यशाबद्दल कॅम्पस संचालक संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्रा. अझहरुद्दीन शेख यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधन वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages