ईच्छा भगवंताची परिवाराकडून उपमुख्यमंत्री‎ सुनेत्रा‎ पवार‎ व‎ खा. पार्थ‎ पवार‎ यांचा कौटुंबिक‎ सन्मान - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 21, 2026

ईच्छा भगवंताची परिवाराकडून उपमुख्यमंत्री‎ सुनेत्रा‎ पवार‎ व‎ खा. पार्थ‎ पवार‎ यांचा कौटुंबिक‎ सन्मान

 ईच्छा भगवंताची परिवाराकडून उपमुख्यमंत्री‎ सुनेत्रा‎ पवार‎ व‎ खा. पार्थ‎ पवार‎ यांचा कौटुंबिक‎ सन्मान





सोलापूर‎ (कटूसत्य वृत्त):‎- राजकारणात पक्ष बदलू‎ शकतात, मात्र जिव्हाळ्याचे‎ ऋणानुबंध आणि‎ एखाद्या‎ नेत्याविषयीची‎ निष्ठा‎ कायम‎ राहते,‎ याची प्रचिती रविवारी पुणे येथील 'जिजाई'‎ निवासस्थानी आली. ईच्छा‎ भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक‎ तथा सोलापूर‎ महानगरपालिका प्रभाग‎ क्रमांक‎ २२ चे‎ भाजपा‎ नगरसेवक‎ किसन‎ जाधव‎ यांनी‎ महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा‎ वहिनी पवार तसेच राज्यसभा खासदार‎ पार्थ‎ दादा‎ पवार यांची कौटुंबिक सदिच्छा‎ भेट‎ घेत त्यांचा सन्मान‎ केला यावेळी‎ स्वर्गीय तत्कालीन‎ उपमुख्यमंत्री‎ अजितदादा‎ पवार‎ यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या‎ हुबेहूब‎ अर्धाकृती‎ मूर्तीची‎ भेट खासदार‎ पार्थ‎ दादा पवार यांना‎ देण्यात‎ आली.‎ हा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत भावनिक‎ ठरला.‎ नुकत्याच बारामती विधानसभा मतदारसंघाच्या‎ पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्याने‎ विजयी‎ झाल्यानंतर‎ उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा वहिनी‎ पवार तसेच‎ राज्यसभेवर‎ बिनविरोध‎ निवड‎ झालेल्या खासदार पार्थ‎ दादा‎ पवार‎ यांचा‎ ईच्छा‎ भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीने यथोचित सत्कार‎ करण्यात आला. यावेळी बोलताना‎ नगरसेवक‎ किसन जाधव‎ म्हणाले, आज‎ मी भारतीय‎ जनता पक्षाचा‎ कार्यकर्ता‎ म्हणून जनसेवेचे‎ काम करत‎ असलो, तरी‎ स्वर्गीय अजितदादा पवार यांच्याशी असलेले ऋणानुबंध,‎ त्यांचे‎ मार्गदर्शन‎ आणि विकासाची‎ दूरदृष्टी मी‎ कधीही‎ विसरू शकत‎ नाही. माझ्या‎ राजकीय प्रवासात‎ अजितदादांनी‎ दिलेला‎ विश्वास आणि पाठिंबा‎ ही‎ माझी‎ कायमची प्रेरणा आहे. ही‎ भेट पूर्णपणे‎ पक्षविरहित असून केवळ‎ आदर,‎ आत्मीयता‎ आणि‎ कृतज्ञतेची‎ भावना‎ व्यक्त करणारी आहे.‎ ते‎ पुढे‎ म्हणाले,‎ अजितदादांच्या‎ अकाली निधनाने‎ महाराष्ट्राने‎ एक दूरदृष्टीचा‎ विकासपुरुष‎ गमावला. ती पोकळी‎ कधीही‎ भरून‎ निघणार‎ नाही.‎ मात्र आज महायुतीच्या‎ माध्यमातून‎ उपमुख्यमंत्री‎ म्हणून सुनेत्रा वहिनी‎ पवार आणि‎ राज्यसभेचे‎ खासदार पार्थ दादा‎ पवार‎ यांच्या‎ माध्यमातून‎ अजितदादांचे‎ विकासाचे स्वप्न पुढे नेले जाईल, असा आम्हाला विश्वास‎ आहे. या‎ भेटीत राजकीय सीमांपलीकडे‎ जपलेले‎ कौटुंबिक‎ संबंध, एका‎ नेत्याविषयीची‎ कृतज्ञता आणि विचारांप्रती असलेली‎ निष्ठा‎ यांचे भावनिक‎ दर्शन घडले.‎ स्वर्गीय अजितदादांच्या‎ विचारांवर चालत जनसेवेचा‎ वसा जपणाऱ्या‎ किसन जाधव‎ यांच्या‎ या‎ आगळ्यावेगळ्या‎ सन्मानाने‎ उपस्थितांच्या मनात‎ विशेष‎ आदर‎ निर्माण‎ केला. याप्रसंगी युवा नेते‎ चेतन‎ नागेश अण्णा गायकवाड, विनायक शिवशेट्टी, माणिक‎ कांबळे,‎ महादेव राठोड, यल्लप्पा शिवपुरे,‎ वैभव प्रचंडे‎ यांच्यासह‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराचे‎ पदाधिकारी‎ व सदस्य आधी उपस्थित होते.‎

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages