शंभू महादेव भेट सोहळा व माऊली पालखी भेट सोहळा शिखर शिंगणापूर पाटी येथे संपन्न,
नातेपुते (कटूसत्य वृत्त):-श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा रविवार दिनांक १९ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होऊन धर्मपुरी, मोरोची येथील विसावा व दुपारचे भोजन उरकून भाविक भक्तांना दर्शनाचा लाभ देत शिखर शिंगणापूर पाटी पानस्कर वस्ती येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज माऊली पालखी व श्री शंभू महादेव भेट सोहळा संपन्न झाला. यावेळी श्री शंभू महादेव देवाचे मुख्य पुजारी वीरभद्र कावडे ( जंगम ) यांचा पालखी सोहळ्यातील मान्यवरांच्या शुभहस्ते तुळशी हार घालून सन्मान करण्यात आला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा एक अत्यंत भक्ती भाव आणि उत्साही भाग असलेला हा शंभू महादेव व माऊली पालखी भेट सोहळा श्री शंभू महादेवाचे पुजारी वीरभद्र कावडे ( जंगम ) यांनी गेले तीन वर्षापासून सुरू केला आहे. या सोहळा भेटीमध्ये शिखर शिंगणापूर येथून श्री शंभू महादेवास अर्पण केला जाणारा बेल, दवणा, भस्म मोठ्या उत्साहाने व भक्ती भावाने त्या ठिकाणी आणला जातो व तो आणलेला बेल, दवणा, भस्म श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मध्ये सर्वत्र वाहून सजावट केली जाते व पालखी मधील पादुकावर बेल, दवणा अर्पण करून शंभू महादेव लावण्यात येणारा भस्म माऊली पालखी मधील पादुकास लावण्यात येतो तो लावल्यानंतर हा शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव भेट सोहळा व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी भेट सोहळा लाखो वारकरी भावी भक्तांच्या उपस्थित संपन्न होतो. या भेटी सोहळा दरम्यान 'माऊली माऊली' आणि 'हर हर महादेव'च्या जयघोषात वातावरण दुमदुमून जाते. वारकरी कीर्तन, प्रवचन, आणि भजनात तल्लीन होतात. व शिवपार्वती शिव हर हर महादेव व माऊली माऊली माऊली ज्ञानराज तुकाराम जयघोषात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा नातेपुते या मुक्कामाच्या ठिकाणी मार्गस्थ होतो. यावेळी अनेक भाविक वारकरी शिखर शिंगणापूर येथे जाऊन श्री शंभू महादेवाचे दर्शन घेतात.
फोटो ओळी :
शिंगणापूर पाटी येथे श्री शंभू महादेव व माऊली पालखी सोहळा भेटीदरम्यान पुजारी विरभद्र कावडे

No comments:
Post a Comment