पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 31, 2026

पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा!

 पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा!

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कारने सन्मान 




पुणे(कटूसत्य वृत्त):-   मुंबई येथील ताज प्रेसिडेन्सी हॉटेलमध्ये एका नामांकित वृत्तपत्राद्वारे आयोजित नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यातून चलवादी शिक्षण संस्था संचालित पुणे इंटरनॅशनल स्कूल अॅड ज्युनियर कॉलेजला शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी 'एज्युकेशन अॅवार्ड' ने गौरन्विण्यात आले.राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. हुलगेश चलवादी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी हा सन्मान संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या संयुक्त परिश्रमाला समर्पित करत, हा पुरस्कार संपूर्ण संस्था परिवाराचा असल्याची भावना व्यक्त केली.

पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाधारित अध्यापन, अनुभवाधारित शिक्षण, कौशल्य विकास कार्यक्रम, व्यक्तिमत्त्व विकास, विज्ञान व नवोपक्रम उपक्रम, क्रीडा, कला-संस्कृती तसेच पर्यावरण जनजागृती यांसारख्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी सातत्याने प्रयत्न केले जातात.

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास विकसित करण्यासाठी विविध प्रकल्प, कार्यशाळा आणि स्पर्धांचे नियमित आयोजन करण्यात येते. या पुरस्कारामुळे संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीला नवी प्रेरणा मिळाली असून, गुणवत्तापूर्ण आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देण्याच्या संस्थेच्या ध्येयाला अधिक बळ मिळेल, अशी भावना डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली.

शाळेत सर्वधम समभावाचा आर्दश समोर ठेवून विविध सण,उत्सव साजरे केले जातात. विद्यार्थ्यांमध्ये ज्वाज्वल्य देशभक्तीची भावना विकसित करण्यासाठी 'एमसीएफ'चे प्रशिक्षण देखील दिले जाते. लहान वयातच मुलांना प्रशासकीय कामकाजांची माहिती मिळावी यासाठी शाळेकडून 'फिल्ड ट्रिप' उपक्रम राबवला जातो, हे विशेष.
.....

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages