विकसित प्रभाग ही ओळख कायम ठेवण्यामध्ये उपनगराध्यक्ष दत्तात्रय खवळे यांना यश
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहराच्या पूर्व भागातील मोक्याचा आणि विकसित प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक चार मधील जिजाऊ रेसिडेन्सी मधील रस्त्यावरील चिखल दलदलीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लावण्यामध्ये मोहोळ नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा या प्रभागाचे नगरसेवक दत्तात्रयअण्णा खवळे यांना यश मिळाले आहे.या पुढील काळातही उर्वरित रस्ते, पाणी, गटार इत्यादी विविध मूलभूत सुविधांचे प्रश्न माजी नगरसेवक मुस्ताक शेख यांच्या सहकार्याने सोडविण्यासाठी मी वचनबद्ध असल्याचे यावेळी उपनगराध्यक्ष दत्तात्रय अण्णा खवळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.दैनंदिन प्रभाग भेटी दरम्यान यापुर्वी उपनगराध्यक्ष खवळे यांना येथील नागरिकांनी रस्ते आणि गटाराचा प्रश्न सोडवण्याबाबतची विनंती केली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सरकार परिषदेचे अध्यक्ष ना.राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखालील निधीतून उपनगराध्यक्ष दत्तात्रय खवळे यांच्या प्रयत्नातून जिजाऊ रेसिडेन्सी मधील अद्यावत गटार आणि दर्जेदार स्वरूपाचा डांबरीकरणाचे काम पुर्ण करण्यात आले आहे.चौकट२०१६ मध्ये झालेल्या नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभागातील मतदार बंधू भगिनींना विकासकामांचे दिलेले आश्वासन आणि नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीमध्ये पुनश्च विजयी झाल्यानंतर विकास कामे पूर्ण करण्याची जबाबदारी वाढली. नगरसेवक हा खऱ्या अर्थाने जनतेचा सेवक असतो. त्यामुळे आमच्या या प्रभागातील दलदल कायमस्वरूपी हटवायची हे ध्येय ठेवून वरिष्ठ स्तरावरून निधी मिळवून अद्यावत गटार आणि दर्जेदार रस्त्याचे काम पूर्ण करून दाखवल्याचे मनस्वी समाधान वाटत आहे. केवळ विकासकामे करायची नाही तर ती दर्जेदारच करण्याची आमची कार्यपद्धती आहे. म्हणून पुन्हा प्रभाग क्रमांक चारच्या जनतेने मला आणि माजी नगरसेवक मुस्ताक शेख यांच्या सुविद्य पत्नी शाहिस्तापरवीन मुस्ताक शेख यांना भरभरून मताधिक्य देत पुन्हा सेवा करण्याची जी संधी दिली त्या संधीचे सोने केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.दत्तात्रय खवळेउपनगराध्यक्ष मोहोळ नगरपरिषद
.jpg)

No comments:
Post a Comment