जयहिंद उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी
कसबे तडवळे (कटूसत्य वृत्त):- सन 2007-2008 मध्ये इयत्ता बारावी पास होऊन पुढे 2019 मध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून जि. प. रत्नागिरी येथे कार्यरत असलेल्या गणेश बापूराव जगदाळे यांनी रत्नागिरी जिल्हा परिषद चिपळूण पंचायत समिती, मांडकी केंद्राच्या केंद्रप्रमुख पदी निवड झालेली आहे.
यावेळी गणेश बापूराव जगदाळे यांनी त्यांना जयहिंद उच्च माध्यमिक विद्यालय, क.तडवळे येथे अकरावी बारावी मध्ये शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेत मिळालेल्या मार्गदर्शनाचा व रविवारी घेतल्या जात असणाऱ्या विविध विषयांच्या चाचण्यांचा उपयोग स्पर्धा परीक्षेत झाला असल्याचे सांगितले. त्यांच्या या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी.वाय.यादव, उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे, जनरल सेक्रेटरी पी.टी.पाटील ,संस्थेचे खजिनदार व सांस्कृतिक विभागाचे प्रमुख बापूसाहेब शितोळे, जॉईंट सेक्रेटरी अरुणजी देबुडवार सर संस्थेच्या या पदाधिकाऱ्या नी तसेच स्कूल कमिटीचे चेअरमन टी.पी.शिनगारे,रेवडकर,मोहिते, भालके व विद्यालयाचे प्राचार्य एस.एस.पाटील सर यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांना मार्गदर्शन करणारे प्रा.भोसले आर.एम. प्रा.सुतार ए.डी. प्रा.पठाण आय.एल. व प्रा.श्रीमती ढगे .एम.बी.यांनी यशस्वी गणेश जगदाळे यांचे, त्यांच्या पालकांचे गौर (वाघोली) व कसबे तडवळे परिसरात अभिनंदन केले जात आहे.

No comments:
Post a Comment