अकलूज येथे ‘रत्नाई चषक’ राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 8, 2026

अकलूज येथे ‘रत्नाई चषक’ राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन

अकलूज येथे ‘रत्नाई चषक’ राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन



अकलूज (कटूसत्य वृत्त):- प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांच्यावतीने रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त रविवार, १२ जुलै रोजी स.म शंकरराव मोहिते पाटील स्मृती भवन शंकरनगर-अकलूज येथे ‘रत्नाई चषक’ राज्यस्तरीय बुध्दिबळ स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरुपाराणी मोहिते-पाटील व स्पर्धा नियोजन प्रमुख सयाजीराजे मोहिते-पाटील यांनी दिली.
          मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रताप क्रीडा मंडळाने कला, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर
उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ‘रत्नाई चषक’ बुद्धिबळ स्पर्धच्या माध्यमातून देशातील ग्रामीण भागातील स्पर्धक संख्येनुसार सर्वात मोठी स्पर्धा भरविण्याची कामगिरी मंडळाने केली आहे. ही स्पर्धा १० वर्षे वयोगट, १५ वर्षे वयोगट व खुला गट अशा तीन गटांसाठी आयोजित केली आहे. वेगवेगळ्या गटासाठी वेगवेगळी परितोषिके व मेडल्स ठेवलेली आहेत. या स्पर्धेत ३० कॅश प्राईज, ६० ट्रॉफीज, ६० मेडल तसेच प्रत्येक गटात २० पेक्षा अधिक बक्षिसे ठेवलेली आहेत. गेल्या वर्षी ५०० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

ही स्पर्धा स्विझलिंग पद्धतीने खेळवली जाणार आहे. स्पर्धेच्या वेळी सकाळी ९ पर्यंत उपस्थितीची नोंद करावी यानंतर एन्ट्री केल्यास दुसऱ्या राउंडपासून खेळावे लागेल. स्पर्धेसाठी प्रवेश फी रुपये २०० ठेवण्यात आली आहे.

स्पर्धेची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी https://forms.gle/3RFifKZz5Te8Nsxv9
या लिंक चा वापर करावा. तसेच स्पर्धा नोंदणी १० जुलै रोजी सायं. ६ वाजेपर्यंतच ऑनलाईन नोंदणी स्विकारली जाणार आहे. दहा वर्षे वयोगटाकरिता राजन चिंचकर ८९८३०३७०५५, सोळा वर्षे वयोगटाकरिता जयप्रकाश जगताप ९०९६०५२१९७ व खुल्या गटासाठी रावसाहेब मगर ९१४५७८४५८७ या क्रमांकावर संपर्क करून सहभाग नोंदविण्याचे आवाहन मंडळाचे उपाध्यक्ष पोपट भोसले पाटील, सचिव बिभीषण जाधव सर्व संचालक, स्पर्धा प्रमुख अभिजित बावळे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages