ईच्छा भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीने‎ 'भाऊ‎ चषक'‎ टेनिस‎ बॉल क्रिकेट स्पर्धेला‎ उत्साहात प्रारंभ - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 24, 2026

ईच्छा भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीने‎ 'भाऊ‎ चषक'‎ टेनिस‎ बॉल क्रिकेट स्पर्धेला‎ उत्साहात प्रारंभ

 ईच्छा भगवंताची‎ परिवाराच्या‎ वतीने‎ 'भाऊ‎ चषक'‎ टेनिस‎ बॉल क्रिकेट स्पर्धेला‎ उत्साहात प्रारंभ





सोलापूर‎ (कटूसत्य वृत्त):-‎ ईच्छा‎ भगवंताची बहुउद्देशीय सामाजिक‎ संस्थेच्या‎ वतीने‎ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री‎ देवेंद्र फडणवीस‎ साहेब तसेच‎ प्रभाग‎ क्र. २२ चे भाजप नगरसेवक‎ किसन‎ (भाऊ) जाधव‎ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित‎ करण्यात‎ आलेल्या‎ 'भाऊ‎ चषक'‎ भव्य टेनिस‎ बॉल‎ क्रिकेट स्पर्धेचे‎ उद्घाटन‎ बुधवारी‎ नेहरूनगर‎ येथील‎ शासकीय‎ क्रीडांगणावर‎ महापौर विनायक‎ कोंडयाल व‎ सभागृह नेते नरेंद्र‎ काळे‎ यांच्या‎ शुभहस्ते‎ उत्साहात झाले. यावेळी नगरसेवक किसन जाधव, नगरसेविका सौ. चैत्राली शिवराज‎ गायकवाड, सामाजिक‎ कार्यकर्ते शिवराज‎ गायकवाड, चेतन‎ नागेश‎ (अण्णा)‎ गायकवाड, प्रेम‎ गायकवाड व कार्तिक‎ जाधव‎ यांची‎ प्रमुख उपस्थिती होती.‎ उपस्थित‎ मान्यवरांचे‎ स्वागत‎ व‎ सत्कार‎ नगरसेवक‎ किसन जाधव‎ यांच्या हस्ते‎ करण्यात‎ आला याप्रसंगी‎ महापौर‎ विनायक‎ कोंडयाल‎ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस‎ व‎ नगरसेवक‎ किसनभाऊ जाधव‎ यांना‎ वाढदिवसानिमित्त‎ शुभेच्छा देत, अशा स्पर्धांमुळे‎ युवकांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी‎ सक्षम व्यासपीठ‎ उपलब्ध‎ होत‎ असल्याचे सांगितले. ग्रामीण व‎ शहरी भागातील‎ प्रतिभावान‎ खेळाडूंना प्रोत्साहन‎ देण्यासाठी‎ अशा‎ उपक्रमांची‎ गरज असल्याचे त्यांनी नमूद‎ केले.‎ सभागृह‎ नेते नरेंद्र काळे यांनीही‎ स्पर्धेचे कौतुक करत युवकांनी क्रीडाक्षेत्रात‎ मोठी‎ भरारी घ्यावी, अशी‎ अपेक्षा‎ व्यक्त केली.‎ नगरसेवक किसन‎ जाधव‎ म्हणाले, 'भाऊ‎ चषक'‎ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा उद्देश‎ केवळ‎ सामने‎ आयोजित करणे नसून, टेनिस‎ क्रिकेटला‎ जागतिक दर्जाची ओळख मिळावी आणि‎ येथील‎ खेळाडूंना मोठ्या व्यासपीठापर्यंत‎ पोहोचण्याची संधी मिळावी,‎ यासाठीचा हा छोटासा प्रयत्न‎ आहे. २२‎ ते‎ २५‎ जुलैदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत‎ १६‎ संघ आणि‎ सुमारे २५० खेळाडू सहभागी‎ होत आहेत.‎ प्रथम‎ पारितोषिक‎ रु‎ ४६,०००‎ व ट्रॉफी,‎ द्वितीय‎ रु २३,००० व‎ ट्रॉफी, तृतीय रु‎ ११,०००‎ व ट्रॉफी देण्यात‎ येणार असून,‎ मॅन‎ ऑफ‎ द मॅच,‎ मॅन ऑफ द सिरीज व मालिकावीर‎ असे‎ वैयक्तिक‎ पुरस्कारही‎ प्रदान‎ करण्यात येणार‎ आहेत. स्पर्धेच्या‎ यशस्वी आयोजनासाठी ईच्छा‎ भगवंताची बहुउद्देशीय‎ सामाजिक‎ संस्थेचे पदाधिकारी‎ व सदस्य‎ परिश्रम‎ घेत‎ असून,‎ चार‎ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत रंगतदार सामने क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षण ठरणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages