विद्यार्थ्यांवर लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ नातेपुते कडकडीत बंद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 24, 2026

विद्यार्थ्यांवर लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ नातेपुते कडकडीत बंद

विद्यार्थ्यांवर लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ नातेपुते कडकडीत बंद



नातेपुते (कटूसत्य वृत्त):- दिल्ली येथील जंतर मंतर वर नीट परीक्षेतील पेपर फुटीच्या घटनेचे उत्तरदायित्व स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याने राजीनामा द्यावा यासाठी चालू असलेल्या आंदोलनात सहभागी विध्यार्थी युवक वर्ग यांच्यावर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. 
  नातेपुते शहरात दुपारी एक वाजेपर्यंत कडकडीत बंद पाळून व्यापारी वर्ग तसेच नागरिक यांनी भावी पिढीचे नुकसान होऊ नये म्हणून निषेध व्यक्त केला.
 यावेळी संविधान प्रेमी युवकांनी संविधान चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी शांतता फेरी काढून निषेध व्यक्त केला.यावेळी शब्बीर शेख,बंटीराजे सोरटे,सागर बिचुकले,नवनाथ राऊत,रियाज शेख,संघर्ष सोरटे,समीर सोरटे,विशाल साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त करत तीव्र निषेध नोंदवीला.आभार दत्तात्रय सोरटे यांनी व्यक्त केले.यावेळी शेकडो युवक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages