राजवी अॅग्रो पॉवरचा गळीत हंगाम 2026-27 चा रोलर पूजन सोहळा संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 28, 2026

राजवी अॅग्रो पॉवरचा गळीत हंगाम 2026-27 चा रोलर पूजन सोहळा संपन्न

 राजवी अॅग्रो पॉवरचा गळीत हंगाम 2026-27 चा रोलर पूजन सोहळा संपन्न 





माढा (कटूसत्य वृत्त):- राजवी अॅग्रो पॉवर प्रा.लि. आलेगाव बु., ता. माढा, जि. सोलापूर येथे गळीत हंगाम 2026-27 च्या शुभारंभानिमित्त रोलर पूजन सोहळा  संपन्न झाला.

कारखान्याचे व्हाईस चेअरमन,जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या शुभहस्ते रोलरचे पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत होते.

यावेळी बोलताना अध्यक्ष शिवाजीराव सावंत म्हणाले, "शेतकऱ्यांनी दर्जेदार ऊस दिल्यास कारखान्याला चांगले गाळप करता येते आणि त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांनाच होतो. त्यामुळे सर्वांनी वेळेत तोडणी-वाहतूक करून दर्जेदार ऊस द्यावा. आपल्या एकजुटीतूनच हा हंगाम यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त केला.

या प्रसंगी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक कालिदास सावंत, ऋतुराज सावंत,सूर्यकांत शेंडगे,तानाजी गाडे,भजनदास खटके,जब्बार महाजन,अरविंद खरात, भारत गायकवाड,विठ्ठल काळे,अनील पाटील,राजाभाऊ खटके, शहाजी पाडुळे,सचिन भुसारे, राहुल खटके, गणेश धाईंजे, सुमित साळुंखे, प्रविण बर्गे  यांच्यासह शेतकरी, वाहन मालक,अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजाभाऊ खटके यांनी मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages