शक्तीपिठच्या विरोधात रोहित पवार रस्त्यावर उतरलेत - माढ्याचे "आमदार-खासदार कुठे लपून बसलेत ?"
-शरद पवाराच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते संजय पाटील घाटणेकर यांचा निशाणा-
-शक्तिपिठ बाधीत शेतकर्याचा माढा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा
माढा (कटूसत्य वृत्त):- शरद पवारांच्या नावामुळे माढ्याचे आमदार आणी खासदार निवडून आलेत.आता शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरा."शक्तीपिठच्या विरोधात रोहित पवार रस्त्यावर उतरलेत - माढ्याचे "आमदार-खासदार कुठे लपून बसलेत ?" रस्त्यावरची लढाई लढा, नाहीतर फडणवीसांचे आपण आहात असे घोषित करू असा थेट निशाणा खा.धैर्यशिल मोहिते पाटील आणी आमदार अभिजीत पाटील यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेल्या संजय पाटील घाटणेकर यांनीच स्वपक्षातील खासदार व आमदारांना लगावला.
माढा तहसील कार्यालयावर शक्तिपिठ बाधित शेतकर्यानी धडक मोर्चा काढला.यावेळी घाटणेकरांनी सरकारवर निशाणा साधताना आमदार खासदारांवर टिकेचे बाण सोडले.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात झाली.माढा तहसील कार्यालयावर मोर्च्याचे रुपांतर ठिय्या आंदोलनात झाले.
घाटणेकर पुढे म्हणाले,
शक्तीपिठ रद्दसाठी रोहित पवार रस्त्यावर उतरले आहेत. मात्र माढ्याचे खासदार कुठे तोंड लपवून बसलेत. आमदार कुठल्या बिळात बसले आहेत.? हे शोधून काढाले लागतील असा सवाल उपस्थित करीत दोघांनीही शक्तीपिठ च्या आंदोलनात रस्त्यावर उतरवावे अन्यथा फडणवीसांनी हे पाठवलेले आहेत.असा समज जनतेचा झाल्याशिवाय राहणार नाही.
मुख्यमंत्र्यांना आषाढीच्या महापूजेपासून रोखणार असून शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा पंढरपुरात पाय ठेवू देणार नाही.
शक्तीपीठ महामार्ग केवळ 'अदानीं'च्या फायद्यासाठी.हा मार्ग केवळ खाणीतील खनिज गोव्याच्या पोर्टवर नेण्यासाठी असल्याचा शेतकर्याचा गंभीर आरोप करुन शक्तिपिठमुळे सोलापूर जिल्हातील ९ हजार शेतकरी भूमिहीन होणार आहेत.
खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि आमदार अभिजीत पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावे"; शरद पवार गटाच्या नेत्याचे स्वपक्षीय नेत्यांनाचा आवाहन.
कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ न देण्याचा ठाम निर्धार शेतकर्यानी व्यक्त केला.यावेळी माढा तालुक्यासह माळशिरस,पंढरपुर भागातील शूतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.तहसीलदार संजय भोसलेनी मागणीचे निवेदन स्विकारले.


No comments:
Post a Comment