आरोग्य विद्यापीठात ‘लेव्हल 3: अॅडव्हान्स प्रोफेशनल डेव्हलमेंट प्रोग्राम’ विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, June 4, 2026

आरोग्य विद्यापीठात ‘लेव्हल 3: अॅडव्हान्स प्रोफेशनल डेव्हलमेंट प्रोग्राम’ विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन

 आरोग्य विद्यापीठात ‘लेव्हल 3: अॅडव्हान्स प्रोफेशनल डेव्हलमेंट प्रोग्राम’ विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन




आरोग्य शिक्षणात नेत्वृत्व, संवाद कौशल्य आणि नियोजन आराखडा आवश्यक
- माजी कुलगुरु लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांचे प्रतिपादन


नाशिक(कटूसत्य वृत्त):- आरोग्य शिक्षणात नेतृत्व, संवाद कौशल्य आणि नियोजन आराखडा आवश्यक असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाच्या माजी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प. यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील संेटर फॉर हेल्थ अल्पाईड नॉलेज अॅण्ड रिसर्च अॅनाटॉमी (चक्र) तर्फे ‘लेव्हल 3 - अॅडव्हान्स प्रोफेशनल डेव्हलमेंट प्रोग्राम’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात विद्यापीठाचे मा. कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा.डॉ. संजीव सोनवणे दुरस्थ पध्दतीने उपस्थित होते तसेच माजी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू,  ’चक्र’ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रंजना कुमार, ब्रिग. (निवृत्त) सुबोध मुळगुंद आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेच्या उद्घाटनाप्रसंगी विद्यापीठाच्या माजी कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, आरोग्य शिक्षणात नेतृत्व, संवाद कौशल्य आणि नियोजनाचा आराखडा असणे आवश्यक आहे. आरोग्य क्षेत्रातील संशोधकांनी ज्ञानाचा उपयोग समाजोपयोगी संशोधन करण्यासाठी करावा. यासाठी विद्यापीठातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येतात. आरोग्य क्षेत्रातील अभ्यागतांनी शिस्त, परिश्रम यावर कायम लक्ष केंद्रीत करावे. प्रत्येकाने शैक्षणिक वाटचालीचा आराखडा करुन त्यानुसार सकारात्मक कृती करणे आवश्यक आहे. आरोग्य क्षेत्रात ’इनोव्हेशन’ ला प्राधान्य देणे गरजेचे आहे. गुणवत्तेत वाढ करण्यासाठी विद्यापीठातर्फे नाविन्यपूर्ण प्रयोग, संशोधन आणि कौशल्य विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. प्रशासकीय कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने पारदर्शकता आणि वेगही वाढला आहे.
      त्या पुढे म्हणाला की, आरोग्य शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करून आधुनिकता आणली आहे. शैक्षणिक ज्ञानाचा व कौशल्याचा उपयोग समाजातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी करावा. विद्यापीठ हे
उच्चतम स्तरावरुन शैक्षणिक धोरणाविषयी नेतृत्व करते त्यासाठी आरोग्य क्षेत्रात कामाचा अनुभव असलेल्या तज्ज्ञांचा सहभाग महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
          विद्यापीठाचे मा. कुलगुरु (अतिरिक्त कार्यभार) प्रा.डॉ. संजीव सोनवणे यांनी सांगितले की, आरोग्य शिक्षणात संशोधनाच्या संधी मोठया प्रमाणात आहेत. अॅडव्हान्स प्रोफेशनल डेव्हलमेंट प्रोग्राम कार्यशाळेच्या माध्यमातून संशोधनाच्या माहितीचे आदान-प्रदान करावे जेणेकरुन संशोधनाला योग्य दिशा मिळण्यासाठी मदत होईल. स्थानिक पातळीवर संशोधकांनी केलेली चर्चा व मंथन भविष्यात मार्गदर्शक ठरेल.         मा. पंतप्रधानाच्या संकल्पनेनुसार ’विकसित भारत’ च्या दृष्टीने ’इनोव्हेशन’ संबंधित कार्यशाळा महत्वपूर्ण आहेत. कौशल्य व गुणवत्तावाढीसाठी विद्यापीठाच्या ’चक्र’ मार्फत घेण्यात आलेली कार्यशाळा आरोग्य शिक्षणाचा विस्तार होण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असे त्यांनी सांगितले.
 यावेळी ’चक्र’ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रंजना कुमार यांनी सेक्शन 8 कंपनी अंतर्गत कार्यरत ’चक्र’ शिक्षण व कौशल्य विकास, वैद्यकीय संशोधन आणि दर्जेदार वैद्यकीय सेवेची उपलब्धते कामकाज करण्यात येत आहे. ’चक्र’ अंतर्गत विद्यापीठात ’हब ऑण्ड स्पोकस्’ मॉडेलच्या कार्यरत करण्यात आले आहे. तंत्रज्ञान हस्तांतरण, संयुक्त संशोधन व नवीन कल्पनांची देवाण-घेवाण इत्यादी बाबींकरीता विद्यापीठास राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांशी भागीदारी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेत ड्रायव्हींग ट्रान्सफॉमेशन थ्रु चक्र विशयावर तसेच फ्रॉम रिफ्लेक्शन टु अॅक्शन: द इनर वर्क ऑफ लिडरशिप विषयावर डॉ. हेनल शहा, डॉ. स्वाती फुटाणे यांनी सिम्युलेशन लॅब - शिक्षण विषयावर मार्गदर्शन केले.
       कार्यशाळेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सायली कुंकर यांनी केले तर डॉ. गौरांग बक्षी यांनी उपस्थितांचे आभार मानले.    या कार्यशाळेस विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील तीस पेक्षा अधिक प्राचार्य, अधिष्ठाता व अभ्यागत उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages