अन्नछत्र मंडळाचे कार्य सातासमुद्रापार; गोव्यात दत्त मंदिर जीर्णोद्धारास सुरुवात
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...! सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय...! च्या जय घोषात उत्साहपूर्ण वातावरणात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या गोवा येथील नानोरा बिचोलिम गट नं.४८७/६ या जागेत श्री दत्त मंदिर जीर्णोद्दार भूमिपूजन कार्यक्रम मंगळवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचा विस्तार भक्ताभिमुख होत आहे. याचाच एक भाग म्हणून संस्थेने गोवा येथील नानोरा बिचोलिम गट नं.४८७/६ या जागेत श्री दत्त मंदिर जीर्णोद्दार भूमिपूजन कार्यक्रम शेकडो गोवेकर स्वामी भक्त यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. गोवा येथील पुरोहित प्रमोद केळकर, राजू केळकर यांच्या मंत्र पठण व पूजनाने श्री दत्त मंदिर जीर्णोद्दार भूमिपूजन संपन्न झाला.
दरम्यान श्री दत्त मंदिर जीर्णोद्दार भूमिपूजन बिचोलीमचे आमदार- डॉ. चंद्रकांत शेटे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष- जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व जि.प. सदस्य- प्रमोद मईके, पं. स. सदस्य- निलम खारापूर, माजी सरपंच- शाम अरमलकर, म्हापसा भाजपा अध्यक्ष- योगेश खेडेकर, उत्तर गोवा भाजपाचे- राजेसिंग राणे, अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे, म्हापसा गोवाचे माजी महापौर रोहन कवळेकर, अॅड. रंजिता कवळेकर, मधुसूदन गुरव, कार्ल डिसोजा, गोविंद फडके, परीस ओगळे, अॅड. जीवन कलंघुटकर, मुंबईचे उद्योगपती- विजय तांडेल, मनोज गंगावणे, न्यासाचे वास्तुविशारद, अभियंता योगेश अहंकारी, आराध्य तांडेल, नाशिकचे उद्योगपती शुभम नागरे, सोलापूर उद्योगपती सिद्धाराम व्हलसुरे, प्रा. सायबण्णा जाधव, जानूभाऊ गावडे, शिवराज स्वामी, मैनुद्दीन कोरबू, सर्फराज शेख, महांतेश स्वामी, संतोष माने, मारुतीराव बोरकर, आकाश उदगिरी, मल्लिकार्जुन कोळी, गोकुळ पाटील यांच्या सह गोवा येथील स्वामी भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.
गोवा येथे बहुसंख्येने श्री स्वामी समर्थांचे भक्त असून ते श्री स्वामी अन्नछत्र मंडळाशी जोडलेले आहेत. गोवा येथील नानोरा बिचोलिम येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या जागेत श्री दत्त मंदिर होते. याचा जीर्णोद्दार व्हावा म्हणून तेथील स्वामीभक्तांची मागणी होती.
चौकट :
अन्नछत्र मंडळाचे कार्य सातासमुद्र पार-
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचा विस्तार भक्ताभिमुख होत आहे. याचाच एक भाग म्हणून संस्थेने गोवा येथील नानोरा बिचोलिम गट नं.४८७/६ या जागेत श्री दत्त मंदिर जीर्णोद्दार भूमिपूजन कार्यक्रम शेकडो गोवेकर स्वामी भक्त यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. आम्ही गोवेकरांनी न्यासाकडे केलेली मागणी संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांनी पूर्ण केलेली आहे. आम्हा गोवेकरांची अन्नछत्र मंडळ हे श्रद्धास्थळ आहे. त्यांचे धार्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, संस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
आमदार डॉ. चंद्रकांत शेटे
आमदार बिचोलीम- गोवा राज्य
.png)
No comments:
Post a Comment