मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा आज सज्ज
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- प्रदीर्घ विश्रांतीनंतर मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची सोमवार ता 15 रोजी घंटा वाजणार असून, यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व अध्यक्षांनी शाळा खोल्या धुवून स्वच्छ केल्या आहेत.यात विद्यार्थीही सहभागी झाले होते.
जुन्या व नवोदित विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील विविध विभागाचे अ वर्ग दर्जाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तारीख 2 मे रोजी बहुतांश शाळांना सुट्टी लागली होती.1 मे रोजी विद्यार्थ्यांचा रिझल्ट देण्यात आला होता. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर बाजार पेठेत दप्तर, वह्या व इतर शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांसह चिमुकल्यानी गर्दी केली आहे. अनेक शाळात विद्यार्थ्यांच्या स्वागता साठी व मिरवणुकी साठी घोडे, ट्रॅक्टर, बैलगाडी ,जेसीबी आदींची तयारी करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी कादर शेख, गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक हे गावोगावच्या जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन तयारीचा आढावा घेत आहेत.
मोहोळ तालुक्यात एकूण 338 शाळा आहेत. त्यात जिल्हा परिषदेच्या- 244, खाजगी अनुदानित- 71 व स्वयं अर्थ साहाय्यांच्या- 23 अशी वर्गवारी आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागता साठी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस उपायुक्त वृष्टी जैन आधीसह अन्य अधिकारी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांसाठी मिष्टांन्न भोजनाची ही व्यवस्था केली आहे.
विद्यार्थ्यांच्या सूरक्षेसाठी पापरी शाळेने 30 वर्ग खोल्या साठी गेल्या दोन दिवसापासून 44 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने सीसीटीव्ही बसविणारी पापरीची शाळा जिल्ह्यात एकमेव आहे.

No comments:
Post a Comment