सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य राजीव यादव सेवानिवृत्त - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, June 8, 2026

सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य राजीव यादव सेवानिवृत्त

 सरस्वती विद्यालयाचे प्राचार्य राजीव यादव सेवानिवृत्त 


     

 अंकोली (कटूसत्य वृत्त):- टाकळी सिकंदर येथील सरस्वती विद्यालय व कर्मवीर भिमराव महाडिक कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य  राजीव विठ्ठल यादव  व पर्यवेक्षक  अशोक जाधव  हे प्रदीर्ध सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत झाल्याबद्दल  संस्थेचे उपाध्यक्ष  सुधीर भोसले  यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून निरोप देऊन सन्मान करण्यात आला .

इयत्ता बारावी विज्ञान व कला शाखेतील प्रथम तीन क्रमांक, इयत्ता दहावीतील प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला . तसेच एन.एम.एम.एस. व स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर वर्ग, ग्रामस्थ, पालक उपस्थित होते . पालक, विद्यार्थी व सहकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  परमेश्वर गायकवाड यांनी केले तर आभार मंगेश मोरे यांनी मानले.
फोटो : प्राचार्य राजीव यादव यांचा सत्कार करताना संस्थेचे उपाध्यक्ष सुधीर भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages